आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीवर नजर ठेवल्याने काढला मुदस्सीरचा काटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मकसूद कॉलनीमधील गॅस व्यावसायिक शेख मुदस्सीर शेख ख्वाजामिया (39) याचा दोरीने गळा आवळून 13 मार्च रोजी रात्री सेंट्रल जकात नाका ते सेव्हन हिल्स रोडवर खून करण्यात आला. पत्नीवर वाईट नजर ठेवल्यानेच मुदस्सीरची हत्या केल्याचा जबाब मारेकर्‍यांनी दिला आहे.

शेख मुदस्सीर गॅस विक्रीचा अवैध व्यवसाय पार्टनरशिपमध्ये करत होता. त्याच्याच येथे कामाला असलेल्या सय्यद सादिक सय्यद आरेफ याच्या घरी मुदस्सीर गेला होता. त्या वेळी त्याच्या पत्नीला पाहून मुदस्सीरने अपशब्द वापरले. त्यानंतर मुदस्सीर नेहमी वाईट हेतूने सादिककडे त्याच्या पत्नीविषयी मित्रांसमक्ष विचारपूस करायचा. याचा राग सादिकच्या मनात होता. त्यामुळे मुदस्सीरचा काटा काढायचा, असे सादिकने ठरवले होते. 13 मार्च रोजी मुदस्सीर बायजीपुर्‍यातील स्टार हॉटेल येथे आला. त्याने त्याची कार एमजीएम हॉस्पिटलसमोर उभी केली होती. या वेळी सय्यद सादिक, सय्यद अकबर सय्यद आमिर आणि मोहंमद साजिद मोहंमद खालेद त्यांनी मुदस्सीरच्या कारचा ताबा घेऊन कारमध्येच गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह नाल्यात टाकला.