आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्युमार्गाला ओव्हरटेक करण्यासाठी हवेत रुंद रोड अन‌् कायद्याचा धाक!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - गेल्या सात महिन्यांत ३९ जणांचा बळी घेणाऱ्या औरंगाबाद-नगर महामार्गावर मृत्यूचे तांडव सुरूच आहे. ते रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी “दिव्य मराठी’च्या टीमने शनिवारी तज्ज्ञांसह या रस्त्याची पाहणी केली. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तत्काळ कुठले बदल करणे आवश्यक आहे, यावर तज्ज्ञांशी चर्चा केली. तेव्हा हा जीवघेणा खेळ थांबवण्यासाठी उत्कृष्ट मेटल रस्ता असावा, रस्त्याची रुंदी वाढवावी, प्रत्येक चौकात गतिरोधक तयार करावेत, दिशादर्शक बसवावेत आणि बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण व्हावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
२५ किमी रस्त्यासाठी केवळ २८ पोलिस कर्मचारी
शहर हद्दीत येणाऱ्या या २५ कि.मी. रस्त्यावर सहा अपघातप्रवण स्थळे आहेत. मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. कंपन्यांची वाहनेही धावतात. ही प्रचंड वाहतूक नियमन करण्यासाठी केवळ २८ वाहतूक पोलिस आहेत. त्यातही दोन अधिकारी आणि दोन चालक आहेत. यात काहींची साप्ताहिक सुटी तर काहींची रजा असते. याशिवाय सण, समारंभ आणि व्हीआयपी बंदोबस्तामुळे प्रत्यक्षात २० कर्मचारीच कार्यरत असतात. तिसगाव चौक सोडता कुठल्याच चौकात वाहतूक पोलिस दिसत नाहीत. काही महिन्यांपूर्वीच वाळूजसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग नेमण्यात आला आहे. एक पोलिस निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक या विभागाचे कामकाज सांभाळत आहेत. पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे विभागाचे प्रमुख आहेत.

एकही रस्ता धड नाही : नगरनाका ते वाळूज या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. पावसामुळे ठिकठिकाणी रस्ता उखडून खडी बाहेर पडली आहे. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या बाजूला कायम जड वाहने उभी केलेली असतात. रस्त्यापर्यंत अतिक्रमणे झाली आहेत. जड वाहने बेदरकारपणे चालवली जातात. याकडे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.

रोजएक लाख दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला
वाळूज एमआयडीसी भागात हजार ५०० कंपन्या आहेत. यातील ५० कंपन्या मोठ्या आहेत. सुमारे लाख कामगार तेथे काम करतात. सुमारे लाख कामगार रोज औरंगाबाद शहरातून एमआयडीसीत दुचाकीने अपडाऊन करतात. विशेष म्हणजे यातील बहुतांश दुचाकीस्वार रोज हेल्मेटचा वापर करतात.

२३० दिवसांत ३९ बळी १०० वर जखमी
गेल्याचार दिवसांत वाळूज रोडवरील अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे सुरक्षारक्षक काकासाहेब राखुंडे यांना तिसगाव फाट्याजवळ बसने चिरडले तर गुरुवारी बाळू रुस्तूम पवार (२८), सोमीनाथ भाऊसाहेब पवार (२५) या दोघांना थम्सअप चौकात वाळूच्या ट्रकने चिरडले. या पूर्वीही या महामार्गावर शेकडो जणांचा बळी गेला आहे. जानेवारी २०१६ ते १८ ऑगस्ट २०१६ दरम्यान वाळूज रोडवर तब्बल ८१ अपघात झाले. यात ३९ दुचाकीस्वार ठार तर १०० पेक्षा अधिक जखमी झाले आहे. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांमध्ये बहुतांश कामगारांचा समावेश अाहे. यातील २६ तरुण आहेत. १२ नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

आयसीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य दिलीप गौर, स्थापत्य अभियंता गणेश चंदनकर, प्रा. प्रणव बनसोड, उद्योजक राहुल मोगले या तज्ज्ञांनी एएस क्लब चौक ते वाळूज गावापर्यंत महामार्गाची पाहणी केली. विशेषत: अपघातस्थळांचे बारकाईने निरीक्षण केले.
सध्याचा रस्ता ५० फुटी असून तो विभागला आहे. हा रस्ता किमान ८० फूट असावा. दोन्ही बाजूंनी किमान फुटांचे शोल्डर, पाणी निचऱ्याची सोय असावी.

- १५ किलोमीटरपर्यंत गरज नसताना अनेक ठिकाणी दुभाजक तोडले आहेत. या रिकाम्या जागेतून जड वाहनेही रस्ता ओलांडत आहेत. हे दुभाजक बंद करावेत.
- बेदरकारपणेवाहने पळवणाऱ्यांना कायद्याचा धाक दिसत नाही. तिसगाव फाटा लिंक रोड चौक सोडला तर कुठेच पोलिस दिसत नाहीत.
- स्त्यावरसिडकोने १६५ पथदिवे लावले आहेत. मात्र गेल्या दहा वर्षांपासून यातील एकही दिवा सुरू नाही.
- पुण्याकडून वाहने सुसाट येतात. नगर नाक्यानंतर शहर सुरू होते अशी त्यांची धारणा असते. प्रत्यक्षात वाळूज गाव लागताच वर्दळ वाढते.
- अनेक चौकांत गतिरोधक नाहीत. त्यामुळे वाहने सुसाट धावतात.
- रस्त्यावरकुठेच सूचनाफलक वा वेग नियंत्रणाचे फलक नाही.
- काहीप्रमुख चौकांत सिग्नलशिवाय पर्याय नाही. या रोडवरील चौकांत सुशोभीकरण करणे आवश्यक आहे.
- वाळूजएमआयडीसीतील कंपन्या तीन शिफ्टमध्ये चालतात. सकाळी सात, दुपारी साडेतीन, रात्री साडेअकरा या वेळेत कामगार कंपनीत पोहोचतील अशा पद्धतीने बससेवेचे नियोजन केल्यास दुचाकीस्वार कामगारांची संख्या कमी होईल.
- १० छोट्याकंपन्यांनी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पुणे- मुंबईत अशी सोय करण्यात आली आहे.

नायगाव फाटा : महामार्गाहून नायगावकडे जाणारा रस्ता तर दुसऱ्या बाजूने कंपनीतून ये-जा करणाऱ्या वाहनांचा अंदाज आल्याने अनेकदा या चौकात अपघात होतात. तसेच पाटोदाच्या दिशेने जाणाऱ्या चौकातही अपघात होतात.

ए.एस.क्लब चौक : लिंकरोड चौकातून अवजड वाहने धावतात. या मार्गावरील पथदिवे नेहमीच बंद असतात. त्यामुळे समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होतात. या चौकात अपघाताची संख्या अधिक आहे.

कंपनी मटेरियल गेट : बजाज कंपनीच्या बाजूला मटेरियल गेट आहे. वाळूजकडून औरंगाबादकडे भरधाव निघालेल्या वाहनांना या रस्त्याला जोडलेल्या मटेरियल गेट मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांचा अंदाज आल्यामुळे अनेक अपघात झाले. या मार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. मात्र, त्याचाही वाहनचालकांना अंदाज येत नाही. अचानक ब्रेक लावल्याने अनेक अपघात होतात.

गोलवाडी फाटा : रेल्वेपूल, तिसगाव फाटा ते गोलवाडी फाटादरम्यान दोन पदरी विनादुभाजक रस्ता असल्यामुळे तसेच गोलवाडी फाट्यापासून अचानक चार पदरी सुरू होणाऱ्या रस्त्यामुळे रात्री वाहन चालक गोंधळून जातात. २८ जानेवारी रोजी टकच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

टी.सी.आय. गोदाम
नगररोडकडे जाताना साई पेट्रोल पंपाजवळील चौकात (थम्सअप चौक) दोन दिवसांपूर्वीच दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. या चौकात नेहमीच लगतच्या टीसीआय गोदामाकडे ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळी मोठी वाहने वळण घेत असल्याचा लहान वाहनचालकांना अंदाज आल्याने अनेकदा अपघात झाले आहेत.
तिसगाव फाटा
रेल्वेपूल उतरल्यानंतर तिसगावच्यास्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. औरंगाबादकडे जाणाऱ्या आणि तिसगावकडून येणाऱ्या वाहनांत अपघात होतात. फेब्रुवारी २०१६ रोजी २२ वर्षीय सुहास रोटे या दुचाकीस्वार तरुणाला याच चौकात प्राण गमवावे लागले. इतर चौघांनी याच चौकात प्राण गमावले आहेत.
बातम्या आणखी आहेत...