आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रस्ता ओलांडणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. मृताची अद्याप ओळख पटली नाही. त्यांचे वय अंदाजे ५० असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
शुक्रवारी दुपारी जालना रस्त्यावरील सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळील एका बँकेसमोर ही व्यक्ती रस्ता ओलांडत होती. या वेळी भरधाव इनोव्हा कारने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. काही नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिन्सी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिस मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...