आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद तालुक्याच्या विभाजनाची लगीनघाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहरासाठी स्वतंत्र तहसीलदार असावा ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अंशत: पूर्ण होण्याची चिन्हे असून तशी लगबग शासनदरबारी सुरू झाली आहे. 12 फेब्रुवारीला महसूल विभागाने शासनाकडे नवीन तालुक्याबाबतचा अहवाल पाठवला असून त्यात शहरी व ग्रामीण असे दोन तहसील विभाग करण्याची सूचना केली आहे.

आता निर्णयाचा चेंडू शासनाच्या कोर्टात असून विधानसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबाद तालुक्यासाठी दोन तहसीलदार कार्यान्वित होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. गेल्या शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंचायत समितीच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन केले. तेव्हाच त्यांनी लवकरच नवीन तहसील अस्तित्वात येण्याचे संकेत दिले होते. प्रत्यक्षात त्याआधीच प्रशासनाकडून शासनाने अहवाल मागवला होता. त्यानुसार कारवाई होण्यास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लोकसभेची आचारसंहिता आड आल्यामुळे त्यानंतर याची अधिकृत घोषणा होईल, असे सांगण्यात येते.

प्रस्तावानुसार असा असेल शहरी तहसील विभाग
जसवंतपुरा, फत्तेसिंगपुरा, हिमायतबाग, हिमायतनगर, रसूलपुरा, बायजीपुरा, कुतुबपुरा, भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, मालजीपुरा, पहाडसिंगपुरा, असेफाबाग, बनेवाडी, पदमपुरा, उस्मानपुरा, केसरसिंगपुरा, शहानूरवाडी, इटखेडा, गारखेडा, मुस्तफाबाद, कोकणवाडी, ब्रिजवाडी, नारेगाव, मसनतपूर, मिटमिटा, पडेगाव, रावरसपुरा, दौलताबाद, केसापुरी, केसापुरी तांडा, शिरसमाळ, अब्दीमंडी, माळीवाडा, वंजारवाडी, रामपुरी, शेखापूर, धरमपूर, तिसगाव, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, गोलवाडी, शरणापूर, करोडी, सजापूर, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, गंगापूर नेहरी, वडगाव कोल्हाटी, गेवराई, गेवराई तांडा, गिरनेरा, गिरनेरा तांडा, वडगव्हाण, सातारा, सातारा तांडा, देवळाई, सिंदोन, भिंदोन, शिवगड तांडा, गांधेली, बाळापूर, बागतलाव, हर्सूल.

-असा असेल ग्रामीण विभाग
मुकुंदवाडी, चिकलठाणा, मुर्तुजापूर, सुंदरवाडी, सावंगी, तुळजापूर, आर्शफपूर, वरुड काजी, हिरापूर, फतेपूर, गंगापूर, कच्चीघाटी, सुलतानपूर, वरझडी, वडखा, जयपूर, पीरवाडी, महालपिंप्री, रामपूर, मुरशतकुली, जयवंतपूर, मल्हारपूर, मांडकी, पोखरी, पिसादेवी, सजदपूर, गोपाळपूर, सवलतपूर, अंतापूर, पळशी, बकापूर, कानापूर, कृष्णापूरवाडी, कोलठाण, चौका, चौकावाडी, साताळा, मोरहिरा, खामखेडा, धोंडखेडा, लिंगदरी, कनकोरा, सारोळा, ओव्हर, नायगाव, इस्लामपूरवाडी, भिकापूर, नानकवाडी, जाधववाडी, जटवाडा, जोगवाडा, धोपटेश्वर, रहाळपटी, रहाळपटी तांडा, गावदरी, गावदरी तांडा, आडगाव सरक, आडगाव मोहली, डोणवाडा, बोरवाडी, बोरवाडी तांडा, अंजनडोह, नायगव्हाण, लांबकाना, झाल्टा, निपाणी, टाकळी वैद्य, टाकळी शिंपी, आडगाव (बु.) चिंचोली, परदरी, परदरी तांडा, तोलानाईक, तोलानाईक तांडा, भालगाव, आपतगाव, गारखेडा, विठ्ठलपूर, चितेगाव, चितेपिंपळगाव, पाचोड, एकोड पाचोड, पांढरी पिंपळगाव, पिंपळगाव पांढरी, काद्राबाद, लायगाव, कचनेर, कचनेर तांडा, घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव, गाडीवाट, गाडीवाट तांडा, बेंबळेवाडी, सहस्रमुळी, जोडवाडी, पिंपरी (बु), नायगव्हाण, टाकळी माळी, अंबिकापूर, हसनपूर, पिंप्री (खु.), सांजखेडा, हुसेनपूर, इब्राहिमपूर, उचलती, जाकमाथा, शहापूर, आडगाव (खु.), घारेगाव, घारेगाव एकतुनी, दरखवाडी, एकलहरा, मेहमतपूर, मलकापूर, करमाड, लाडगाव, सटाणा, शेकटा, वाहेगाव, देमणी, करंजगाव, मंगरूळ, जडगाव, हिवरा, टोणगाव, गोलटगाव, नागोण्याची वाडी, कुंभेफळ, शेंद्रा, शेंद्रा कमघर, शेंद्रा बन, कोळघर, कोडगाव, कोडगावजा, कारोळ, लाडसावंगी, भोगलवाडी, सुलतानपूर, गाडे जळगाव, शेवगा, हसनाबादवाडी, कोनेवाडी, पिंपळखुटा, सय्यदपूर, औरंगपूर, दरेगाव, मुरुमखेडा, जळगाव फेरण, बेंदेवाडी, ढवळापुरी, कांचनापूर, सेलुद, चारठा, हातमाळी, रुस्तमपूर, आलमपूर, मुरशदकुली, दुधड, भांबरडा, गेवराई कुबेर, बनगाव.

कलाग्रामशेजारी होणार कार्यालय
नवीन तहसील कार्यालय, औरंगाबाद तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय अधिकारी तसेच फुलंब्री व पैठणचे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय गरवारे क्रीडा संकुलालगत मोकळ्या जागेवर प्रस्तावित आहे. तेथे अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी निवासस्थानांचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दुसरे तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर किंवा पैठण रस्त्यावर असावे, असे काहींचे म्हणणे आहे.