आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, AAP Candidates Lomte And Mhaske

'आप'चे औरंगाबादमधून लोमटे, तर जालन्यातून म्हस्के निवडणूक रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाष लोमटे - Divya Marathi
सुभाष लोमटे

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षातर्फे जालना मतदारसंघातून अमेरिकेत शिक्षण घेत असलेले व मूळ घाटीपुरी (जि. जालना) येथील दिलीप म्हस्के यांना, तर औरंगाबादमधून कामगार नेते सुभाष लोमटे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दोन्ही नावांची घोषणा एक मार्चला होणार असून इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट झाल्याने ते बंडाच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.


‘आप’कडून जिल्ह्यातून 223 जणांनी ऑनलाइन अर्ज भरले. त्यापैकी 16 जणांची मुलाखतीसाठी निवड झाली. बाळासाहेब सराटे औरंगाबाद किंवा जालन्यातून उभे राहण्यास इच्छुक होते. पण त्यांचा पत्ता दोन्हीकडून कट झाला. मनीषा चौधरी, सुरेश पवार, पी. व्ही. मानकर, विनोद गाडे, रवींद्र बोडखे उमेदवारीचे दावेदार होते. जालना जिल्ह्यातून बाळासाहेब म्हस्के, सुभाष देठे, के. व्ही. गोडसे, प्रतिमा मसवले असे 28 जण इच्छुक होते; पण दिलीप म्हस्के यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दिलीप सध्या अमेरिकेत पीआर एजन्सीमध्ये नोकरी करून उच्च शिक्षण पूर्ण करत आहेत. म्हस्के यांना उमेदवारी मिळेल, असा अंदाज असल्याने इच्छुक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दोन दिवसांत ते दुसरा मार्ग जाहीर करतील, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला.


रणनीतीसाठी आज बैठक
लोकसभेची रणनीती आखण्यासाठी राज्य समितीचे सदस्य शकील अहेमद गुरुवारी शहरात येणार असून सिद्धिविनायक लॉन्समध्ये 10 ते 1 वाजेपर्यंत बैठक घेतील.


दोन उमेदवार रिंगणात
जालन्यासाठी समितीने 10 जणांची मुलाखतीसाठी निवड केली. त्यात दिलीप म्हस्के आणि सुभाष देठे यांच्यापैकी एकाची उमेदवारी निश्चित होईल. औरंगाबादमधून सुभाष लोमटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कैलास फुलारी, जिल्हा समन्वयक, जालना लोकसभा.