आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Accident, Divya Marathi

मिनीडोरवर कार धडकून एक जण ठार, तिघे जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: खुलताबादजवळ दुचाकी झाडाला धडकली, दोन तरुणी जखमी)
पाचोड - औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मिनीडोरला मागच्या बाजूने येणा-या स्विफ्ट कारने गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जोराची धडक दिली. या धडकेत एक जण जागीच ठार, तर सहा जण जखमी झाले. भास्कर काशीद (४५) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

भास्कर वामनराव काशीद (रा. डोणगाव, ता. अंबड) व कैलास िभंगारे (३५) हे आपले कामकाज आटोपून मिनीडोर (एमएच २१ १४०४) ने आैरंगाबाद - सोलापूर रस्त्यावरून जात असताना मागच्या बाजूने भरधाव येणा-या स्विफ्ट कारने (एमएच २० सीएस ९०५८) िमनीडोरला जोरदार धडक दिली. या वेळी िमनीडोरमध्ये असलेले सहा जण जखमी झाले, तर एक जण ठार झाला. जखमींमध्ये दगडूमियां शेख (५०, रा. अमलगाव, ता. अंबड), नयनाबी शेख (४५) आदींचा समावेश आहे.

खुलताबादजवळ दुचाकी झाडाला धडकली, दोन तरुणी जखमी
शहरालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विना क्रमांकाची दुचाकी झाडाला धडकली. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून दोघींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. शुभम रवींद्र साळवे हा युवक दुचाकी चालवत होता.

त्याच्यासोबत हिरकण रघुनाथ खैरनार, दीपमाला रवींद्र साळवे या दोन युवती होत्या. ट्रकने हुलकावणी दिल्याने शुभमचा दुचाकीवरील ताबा सुटला व झाडाला दुचाकी धडकली. यात दोन्ही युवती गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणाची माहिती खुलताबाद पोिलसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी
घाटीत हलवले.