आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Aurangabad Municipal Corporation Budget

आज मनपाचा अर्थसंकल्प; मालमत्ता कर वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपाचा 2014-15 चा अर्थसंकल्प उद्या शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केला जाईल. 550 ते 560 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असण्याची शक्यता असून त्यात रस्त्यांच्या कामावर अधिक निधी असेल.
आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे उद्या अर्थसंकल्प सादर करतील. मनपाने आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी मालमत्ता करात 21.5 टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यातून 20 ते 25 कोटी रुपयांची अतिरिक्त भर मनपाच्या तिजोरीत पडेल. तसेच स्वच्छतेसंदर्भात कर आकारून नागरिकांकडून आणखी 20 ते 25 कोटी रुपये कमावण्याचे ठरवले आहे. थोडक्यात, या माध्यमातूनच मनपाने 50 कोटींची बेगमी करून ठेवली आहे.

मात्र, एलबीटीची घसरलेली वसुली ही चिंतेची बाब असून एकीकडे वाढ होत असताना एलबीटीचा खड्डा कसा भरायचा याची मनपाला चिंता आहे. उद्याच्या अर्थसंकल्पात रस्त्यांवर 55 कोटींच्या आसपास तरतूद केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या 45 कोटींच्या कामांचा खर्च याच तरतुदीतून होईल. याशिवाय शिक्षण, आरोग्य यावरील खर्चात येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. मनपा रुग्णालयांत जन्मणार्‍या प्रत्येक मुलीचा विमा काढण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला तरतुदीचे पाठबळ या अर्थसंकल्पात मिळेल.