आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Aurangabad Municipal Corporation Delayed Road Work

मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे क्रांती चौक-रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम रेंगाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुढील महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असलेले क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन काँक्रीट रस्त्याचे काम मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणखी किमान सहा महिने लांबण्याची चिन्हे आहेत. 14 महिन्यांत अवघे सव्वा किलोमीटरचे फक्त काँक्रिटीकरणच झाले असून बाकीच्या कामांना तर मुहूर्त लागायचा आहे. परिणामी पुढचे काही महिने तरी नागरिकांचा छळ सुरू राहील.


क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या सिमेंट-काँक्रीट रस्त्याचे काम अतिशय कूर्मगतीने सुरू असून मनपाच्याच विभागांत समन्वय नसल्याने हे काम लांबत चालले आहे. याच गतीने काम चालल्यास हा रस्ता आगामी सहा महिन्यांतदेखील पूर्ण होणे अशक्य आहे.


भव्य चौपदरी सिमेंट-काँक्रीटचा रस्ता करण्याचे हे काम मनपाने 2012 च्या डिसेंबर महिन्यात हाती घेतले. मार्च 2014 पर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवे होते; पण पहिल्या दिवसापासून अडथळ्यांचा सामना सुरू झाल्याने या रस्त्याची पुरती वाट लागली. दर महिन्याला आढावा घेऊ, समन्वयाने कामे मार्गी लावू, दोन महिन्यांत पूर्ण होईल, डिसेंबरपर्यंत सगळे काम संपेल अशी आश्वासने आयुक्त, महापौर, खासदार आणि इतर पदाधिकार्‍यांनी देऊनही काम मंदगतीने सुरू आहे. ‘दिव्य मराठी’ने या कामाच्या प्रगतीचा, लागत असलेल्या विलंबाचा आढावा घेतला असता किमान सहा महिने तरी हे काम पूर्ण होणे अशक्य आहे, हे स्पष्ट झाले आहे.


बहुतेक अडचणी दूर
या रस्त्याच्या कामातील बहुतेक अडचणी आता दूर झाल्या असून हे काम येत्या काही दिवसांत आणखी वेगाने होईल. ड्रेनेज व पाण्याच्या लाइन हलवण्याचे काम सुरू आहे, रेल्वेची जागा लवकरच ताब्यात येईल. जास्तीत जास्त वेगात काम पूर्ण केले जाईल. डॉ. हर्षदीप कांबळे, मनपा आयुक्त


रस्त्याविषयी सारे काही रखडलेली कामे
* कामास प्रारंभ - डिसेंबर 2012
* कामाची मुदत - मार्च 2014
* 14 महिन्यांत दीड कि.मी काम
* विशेष - चार लेनपैकी दोन्ही बाजूंना एक लेन सिमेंटची, एक डांबरी
* दोन्ही बाजूंना फुटपाथ आणि इतर सुविधांसाठी दहा मीटरची जागा असणार आहे


फक्त सव्वा किमी काँक्रिटीकरण
0 भाजप कार्यालय ते उस्मानपुरा चौक, एसएससी बोर्ड ते पदमपुरा चौक, पदमपुरा चौक ते बन्सीलालनगर दोन्ही बाजू या भागांचे काँक्रिटीकरण झाले
0 वन विभाग ते पदमपुरा चौक ते एमटीडीसी या भागांत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
0 बन्सीलालनगर ते तंदूर हॉटेल, एमटीडीसी ऑफिस ते रेल्वेस्टेशन, विक्रीकर कार्यालयासमोर खोदकाम सुरू