आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Badanapur Wheat Scam, Divya Marathi

बदनापूरमध्ये गहू घोटाळा दडपण्याचा प्रयत्न; अहवालानंतरही तहसीलदारावर गुन्हे नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मंत्रालयातील पुरवठा आयुक्तालयाच्या पथकाच्या धाडीत जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील शासकीय गोदामात बाराशे क्विंटल गहू कमी, तर ६०० क्विंटल तांदूळ जास्त आढळला. गहू कमी आढळल्यानंतर पथकाने गुन्हे दाखल करण्याऐवजी मुंबईहून जालना जिल्हाधिका-यांना तीनसदस्यीय समिती नेमून कारवाईचे आदेश दिले. कमी आढळलेल्या बाराशे क्विंटलपैकी ६०० क्विंटल गहू गोदामात जमा झाल्याचे दाखवून घोटाळा दडपण्याचा प्रकार केला जात असल्याचे समोर आले आहे.

मुंबईच्या पथकाने २२ व २३ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील शासकीय गोदामाची झाडाझडती घेतली. यामध्ये बदनापूरच्या गोदामात सुमारे १२०० क्विंटल गव्हाची पोती कमी, तर ६०० क्विंटल तांदूळ जास्त आढळला. पथकाच्या मते गहू काळ्याबाजारात विक्री झाला. पथकाने तपासणीनंतर काढून जालना जिल्हाधिका-यांच्या नावे तसे पत्र पाठवले. गहू घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीनसदस्यीय समिती नेमून अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करून त्याचा अहवाल मंत्रालयास सादर करण्यास सांिगतले. या पत्रानुसार जिल्हाधिकारी ए.एस.आर. रंगानायक यांनी तीनसदस्यीय समिती नेमली. समितीलाही तपासणीत गोदामात १२०० ऐवजी ६०० क्विंटल गहू कमी आढळून आला. अहवालानंतरही जिल्हाधिका-यांनी गोदामरक्षक आणि तहसीलदारांवर गुन्हे दाखल करण्याचे धाडस केलेले नाही.

रेकॉर्ड व्यवस्थित नाही
^मंत्रालयातील पथकाने केलेल्या झाडाझडतीत गहू कमी आढळला. मात्र, रेकॉर्ड व्यवस्थित नसल्याने गहू काळ्याबाजारात गेल्याचे दिसले. मात्र, माझ्या मते तसा प्रकार नाही.
बालाजी क्षीरसागर, तहसीलदार.

निर्णय कलेक्टरांचा
शासकीय गोदामाच्या तपासणीमध्ये गहू कमी आढळून आला असून समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल.
अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना.