आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - आपल्या प्रचार कार्यालयाच्या कानाकोपर्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या मदतीने खासदार चंद्रकांत खैरे अगदी प्रवासातही आपल्या टॅबवरून येणार्या जाणार्या प्रत्येक कार्यकर्त्यावर नजर ठेवणार आहेत. ही यंत्रणा अविश्वासातून केली की आणखी कोणत्या कारणाने, हे स्पष्ट झाले नसले तरी यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची प्रचार यंत्रणा हायटेक बनली आहे.
शिवसेनेची आतापर्यंतची प्रचार यंत्रणा साधी सरळ थेट कार्यकर्त्यांवर अवलंबून असे. आता त्यात काळानुसार बदल झाले असून नव्या तंत्राचा वापर सुरू झाला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांचे सर्मथनगरातील संपर्क कार्यालय हेदेखील हायटेक झाले असून त्यात नवीन सुविधांचा वापर सुरू झाला आहे. या कार्यालयाचा कोपरान्कोपरा सीसीटीव्ही कॅमेर्याच्या निगराणीखाली असून येणार्या जाणार्यासह प्रत्येक दालनातील व्यक्तीवर नजर ठेवता येईल, अशी ही यंत्रणा आहे. या कॅमेर्याच्या माध्यमातून खासदार खैरे नजर ठेवत आहेत. कार्यालयात असताना तेथील मोठय़ा पडद्यावर ते पाहत असतातच; पण प्रवासातदेखील हातातील टॅबच्या मदतीने कार्यालयाच्या प्रत्येक घडामोडीवर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यासाठी 3जीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
सध्या शिवसेनेत आणि मतदारांतही खैरे यांच्याबाबत नाराजी असल्याने कदाचित त्यातूनच कार्यालयातील प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आली असावी, अशी शक्यता काही शिवसैनिकांनी बोलून दाखवली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.