आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Chilly Crops, Kavita Nimbore

अर्धा एकर मिरचीतून साडेसहा लाखांचे उत्पन्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नापिकी आणि उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाल्यामुळे शेती करणे परवडत नसल्याची हल्ली ओरड केली जाते. त्यामुळे शेती विकून नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा ‘ट्रेंड’ही नव्या पिढीत बळावला आहे. सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील कविता निंभोरे या 24 वर्षीय महिलेने मात्र सर्व शेतकर्‍यांसमोर वेगळाच आदर्श ठेवला आहे. निव्वळ अर्धा एकर शेतीमध्ये साडेसहा लाखांच्या तीनशे किं्वटल लवंगी मिरचीचे उत्पन्न घेऊन विक्रम केला आहे.


दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 11 मे 2004 रोजी अशोक दामोदर निंभोरे या शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मीच्या पावलाने आलेल्या कविताने पंचक्रोशीत सर्वाधिक विक्रमी उत्पन्न घेण्याचा मान पटकावला आहे. अर्धा एकर शेतीमध्ये मे 2013 मध्ये लवंगी मिरचीची लागवड केली. त्यानंतर 80 दिवसांनी पहिल्या वेचणीत 24 हजार रुपयांची मिरची मिळवली. त्यानंतर प्रत्येक बारा दिवसांनी 12 क्विंटल ते 37 किं्वटलच्या लसलशीत मिरचीचे पीक घेतले आहे. आतापर्यंत 22 वेळा वेचणी करण्यात आली असून 300 किं्वटलचे उत्पन्न मिळवले आहे. योग्य बियाणे, खत आणि मजुरीसाठी कविताला दीड लाखाचा खर्च आला. साडेसहा लाखांच्या उत्पन्नातून दीड लाखाचा खर्च वजा केला तर नऊ महिन्यांत पाच लाखांचा निव्वळ नफा कमावण्याची किमयाही कविताने करून दाखवली आहे. बाजारात मिरची सध्या तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री होत असून कविताने स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य देण्याऐवजी नवी मुंबईच्या बाजारात मिरची विकली आहे. कविताच्या मते सर्वसामान्य शेतकर्‍यांप्रमाणे महाधनचे खत, डीएपी 1846 आणि वीस वीस झीरोचे तीन वेळा तीन बॅग खतांचाच आपण वापर केला आहे.