आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, DB Star Stars Competation, Silver Coins

डीबी स्टारचे स्टार्स विजेत्या स्पर्धकांना चांदीच्या नाण्यांचे वितरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दैनिक भास्कर समूहातर्फे घेण्यात आलेल्या ‘डीबी स्टारचे स्टार्स’ स्पर्धा खूप आवडली आणि वाचकांसाठी अशा स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या पाहिजेत, अशी अपेक्षा विजेत्या स्पर्धकांनी व्यक्त केली. या स्पर्धेतील विजेत्यांना दैनिक ‘दिव्य मराठी’ कार्यालयात चांदीची नाणी देण्यात आली. प्रत्येक विजेत्याला 10 ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले.
या वेळी विजेते स्पर्धक भास्कर काथार, सतीश धुमाळ, पूजा रसाळ, इंद्र कुमार, कुंदन राजपूत, अनुपमा दुधमल, सुरेश पद्मे, केदार जाधव, मनीषा पाटील यांचे डीबी स्टार टीमच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘दिव्य मराठी’चे स्टेट बिझनेस हेड निशित जैन, राज्य संपादक प्रशांत दीक्षित, महाव्यवस्थापक परमजितसिंग, डीबी स्टार प्रमुख रूपेश कलंत्री यांची उपस्थिती होती. विजेत्यांचे अभिनंदन करताना प्रशांत दीक्षित म्हणाले की, डीबी स्टार लोकप्रिय असून त्यात वाचकांच्या सूचनांचे योगदान महत्त्वाचे आहे.
खास डीबी स्टारच्या वाचकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळपास महिनाभर चाललेल्या या स्पर्धेत हजारो वाचकांनी सहभाग घेतला. याअंतर्गत दैनिक ‘दिव्य मराठी’त रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी काही प्रश्न प्रकाशित करण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तरे त्याच दिवशीच्या डीबी स्टारमध्ये प्रसिद्ध केली जात होती. योग्य उत्तर पाठवणा-या वाचकांपैकी सोडतीद्वारे विजेते जाहीर करण्यात आले.
डीबी स्टारमधील मजकूर वाचनीय असतो. मात्र, ग्रामीण भागातही डीबी स्टार देण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून शेतक-यांचे प्रश्न मांडता येतील.
सतीश धुमाळ
औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातही डीबी स्टारचा अंक पोहोचण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने एखादे सदर असावे.
पोपट रसाळ
डीबी स्टारमध्ये देण्यात येणा-या इंग्रजी मजकुरामुळे आमच्या मुलांना इंग्रजी वाचनाची सवय लागत आहे. यातील भाषा अत्यंत सोपी असल्याने आम्हालाही कळण्यास मदत होते.
अनुपमा दुधमल
डीबी स्टारमध्ये सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षेविषयी माहिती असलेले एखादे सदर सुरू करावे. नोकरीविषयक माहिती दिल्यास आजच्या तरुण पिढीला ते खूप मार्गदर्शक ठरेल.
केदार जाधव