आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मांसाचे ५ ट्रक जाळले, औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर/गारज - तालुक्यातील ढेकू नदीवरील जुन्या पुलावर शनिवारी सकाळी आठ ते दहा व्यक्तींनी मांसाने भरलेले पाच ट्रक जाळून टाकले. या घटनेनंतर औरंगाबाद -नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प होती.

मांस व हाडांनी भरलेले पाच ट्रक हैदराबादहून मालेगावकडे निघाले होते. कसारी घाट (नांदगाव) येथे हे ट्रक अडवून परत पाठवण्यात आले. गारज परिसरातील ढेकू नदीवरील पुलावर ट्रक येताच आठ ते दहा जणांनी पाचही चालकांना खाली उतरवले आणि डिझेल ओतून ट्रक पेटवून दिले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पोखरीमार्गे औरंगाबादकडे वाहने मार्गस्थ केली. अग्निशमन दलाच्या चार बंबांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न झाला; परंतु रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक बसवराज तेली, गंगापूरच्या डीवायएसपी जयश्री देसाईंनी घटनास्थळी भेट दिली. आठ लोकांनी ट्रक अडवून पेटवल्याची माहिती ट्रकचालकांनी दिली.