आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Ellero, Divya Marathi

बेवारस बॅगने खळबळ; काही क्षणांत लेणी निर्मनुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - वेरूळच्या कैलास लेणीत रविवारी दुपारी बेवारस बॅग असल्याची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक व पोलिसांनी धावपळ करत लेणी परिसर त्वरित
रिकामा करून बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले.

दोन तास चाललेल्या या गोंधळानंतर बॅगेत अधिका-यांची कागदपत्रे आढळल्याने ही मॉकड्रील सुरक्षा चाचणी असल्याचे समजताच पर्यटकांसह पोलिस अधिका-यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पर्यटन हंगाम व श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सध्या लेणीत पर्यटकांचा ओघ वाढला असून सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठ पोलस अधिका-यांकडून सुरक्षा चाचणी किती सक्षम आहे हे पाहण्यासाठी प्रो. डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी नवनियुक्त पोलिस अधीक्षक अनिल
कुंभारे यांच्या आदेशान्वये तपासणी केल्याचे सांगितले.

कैलास लेणीच्या प्रवेशद्वारावर सकाळी गर्दीच्या वेळी कचरा पेटीच्या बाजूला बेवारस काळी बॅग असल्याचे सुरक्षा रक्षक दादासाहेब पवार यांच्या निदशर्नास आले. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना ही माहिती पोलिस निरीक्षक पुरभे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी त्वरित पोलिस उपअधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले. काही मिनिटांतच कैलास लेणी निर्मनुष्य करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले होते. काही वेळातच येथे औरंगाबादहून बॉम्बशोधक-नाशक पथक रेनो या श्वानासोबत हजर झाले. तपासणी केली असता ही सुरक्षा चाचणी असल्याचे कळल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

सव्वा तासात लेणीत
गर्दीतून वाट काढत सव्वा तासात लेणीत - सध्या सुटीचा हंगाम असल्याने वेरूळ मार्गावर गर्दीमुळे नेहमी वाहतूक जाम होते. मार्ग काढत आम्ही सव्वा तासात येथे पोहोचलो. यासाठी मोठी कसरत करावी लागली.
बी.जी. व्हेवाळ, पथकप्रमुख, बीडीडीएस