आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Export Import Centre, Divya Marathi

आयात-निर्यातीचे आंतरराष्ट्रीय केंद्र औरंगाबादेत होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जळगाव, अहमदनगरसह मराठवाड्यातील शेतकर्‍यांचा निर्यातक्षम शेतमाल आता थेट औरंगाबादेतून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणार आहे. भारत सरकारच्या केंद्रीय उत्पादन व सीमाशुल्क मंडळाने औरंगाबादच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीचे केंद्र घोषित केले आहे.


7 एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय उत्पादन तथा सीमाशुल्क विभागाचे औरंगाबादेतील आयुक्त कुमार संतोष यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. एअर कार्गो हब करण्याच्या दृष्टीने या हालचाली करण्यात आल्या असून आणखी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर येथून मालवाहतुकीचे दळणवळण सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र स्टेट अँग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड या दोन्ही संस्था आता आंतरराष्ट्रीय मानकानुसार येथील ‘कार्गो हब’ला आवश्यक असलेल्या सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे कुमार यांनी कळवले आहे.