आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Farming, Biology, Terrace, Divya Marathi

त्यांनी गच्चीवर फुलवली उत्तम शेती अन् फळबाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गच्चीवरची शेती हा प्रकार आता तसा नवीन राहिलेला नाही. अनेकांनी या गोष्टी केल्या आहेत; पण शहरातील सूक्ष्मजीवशास्त्राच्या एका प्राध्यापकाने कचरा आणि घरात उरणा-या खरकट्या अन्नाचा प्रयोग करून घरच्या घरी खतनिर्मिती केली आणि त्यावर भाजीपाला, सर्व प्रकारची फळांची शेती केली. अगदी पत्ताकोबी, फुलकोबीपासून भेंडी, गवार आणि कोथिंबिरीपर्यंत सर्व भाज्या पिकवल्या, तर फळांमध्ये लिंबापासून ते अंजिरापर्यंत आणि सीताफळापासून ते थेट डाळिंबापर्यंत सर्व प्रकारची फळे घेतली आहेत. त्यातून कच-याची आणि अन्नाचीही योग्य विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे हा प्रयोग त्यांनी आपल्या शेकडो विद्यार्थ्यांना, परिसरातील लोकांना शिकवला. अनेक शहरांत त्याचे प्रशिक्षण दिले. अलीकडेच हर्सूल तुरुंगातील कैद्यांनाही त्यांनी या प्रयोगाचे धडे दिले. खतनिर्मिती करताना दुर्गंधी सुटू नये तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बायोसॅनिटायझरची (व्हर्मी प्लस प्लस) ट्रीटमेंट ते देतात. आतापर्यंत अनेक लोकांनी, संस्था-संघटनांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या या सिटी फार्मिंगचा प्रयोग आत्मसात केला आहे.


सूक्ष्मजीवशास्त्रात प्रॅक्टिकलच्या वहीच्या आर. आर. पॅटर्नमुळे विद्यार्थीवर्गात प्रसिद्ध असलेले डॉ. रवींद्र रमाकांत देशपांडे यांचे स्वत:चे शिक्षण शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी उच्चशिक्षण घेऊन डॉक्टरेट मिळवली आणि ते सूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक म्हणून रुजू झाले. डॉ. देशपांडे यांनी अनेक विद्यार्थी घडवले. पुणे येथे राज्याच्या उच्चशिक्षण विभागात सहसंचालक पदावर ते कार्यरत होते. आता ते औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत प्रभारी संचालक पदावर कार्यरत आहेत. सूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक असल्याने 2003 मध्ये ते शेषराव चव्हाण यांच्या प्रेरणेने भारतीय विद्याभवनच्या सिटी फार्मिंग अभियानात सहभागी झाले. तेव्हापासूनच त्यांनी कचरा व उरलेल्या अन्नातून उत्तम खतनिर्मितीचा प्रकल्प शहरात व गावागावात राबवला.

पुढे वाचा काय होते आव्हान....