आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Fourline Aurangabad solapur Highway

दिव्य मराठी विशेष: औरंगाबादहून सोलापूर गाठा चार तासांत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुण्याहून मुंबईला अडीच तासांत पोहोचता येते. तसेच औरंगाबादहून सोलापूर गाठणे शक्य होणार आहे. 300 कि.मी.चे हे अंतर अवघ्या चार तासांत कापता यावे यासाठी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचे काम करणा-या आयआरबी कंपनीला सोलापूर-धुळे महामार्गातील औरंगाबाद ते येडशी हे 4 हजार कोटींचे काम मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होणारे हे काम अठरा महिन्यांत पूर्ण होऊ शकते.
धुळे-सोलापूर मार्गाचे काम राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले. 2011 मध्ये एजिस इंडिया कंपनीने सर्वेक्षण करून मार्गाबाबत अहवाल दिला. अरुंद रस्त्यामुळे सोलापूरला पोहोचण्यासाठी सध्या दहा तास लागतात. चौपदरीकरण झाल्यास हा प्रवास चार तासांवर येऊ शकतो, असा अहवाल कंपनीने दिला. पुढे प्राधिकरणाने पर्यावरण, वन्यजीव मंत्रालये व राज्याला पत्र दिले. दोन वर्षात 290 कि.मी.चे भूसंपादन पूर्ण झाले.


फायदा काय?
० मुंबई-पुणेसारखा एक्सप्रेस हायवे येथे उभा राहणार
० सोलापूर-धुळे हा महामार्ग डीएमआयसीशी जोडला जाईल
० अपघातांचे प्रमाण कमी होणार
० बीड, उस्मानाबाद, तुळजापूर प्रवासाचा वेळ घटणार


निविदा अशा
महामार्गाच्या तीन टप्प्यातील कामापैकी औरंगाबाद-येडशी मार्गाचे काम 1904 कोटी रुपयांमध्ये प्रस्तावित होते. मात्र, विलंबामुळे ते 4 हजार कोटींच्या घरात गेले आहे. त्याची निविदा बुधवारी उघडली. त्यात आयआरबी- 558, ओरिएंटल- 625.89, आयएफएलएस- 654.90 कोटी रुपये दराने निविदा दाखल केली. कमी दरामुळे आयआरबीला काम मिळाले.