आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Fruits Export, Hailstorm, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फळ निर्यातीला फटका,गारपिटीमुळे राज्याचे 2 हजार कोटींचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यभरातून आंबा, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आदी फळांची परदेशात मोठय़ा प्रमाणावर निर्यात केली जाते. त्यातून 3,186.44 कोटींपेक्षा अधिक विदेशी चलन मिळते. मात्र सततच्या गारपिटीमुळे एक लाख हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यात सरासरी 25 टक्के फलोत्पादनाचे नुकसान झाले. अंदाजे दोन हजार कोटींपेक्षा अधिक निर्यातीला फटका बसल्याचे फलोत्पादन तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मराठवाड्यातील केशर आंबा आणि डाळिंबाचे यात अधिक नुकसान झाले आहे.
राज्यात 18.34 लाख हेक्टरवर फलोत्पादन घेतले जाते. राज्यातून अमेरिका, स्वित्झर्लंड, रशिया, फ्रान्स, र्जमनी, जपान आदी देशांत फळांची निर्यात होते. पण यंदा द्राक्ष, केळी, मोसंबी, आंबा, डाळिंब आदींचे गारपिटीने अतोनात नुकसान झाले आहे.
90 टक्के फळे उद्ध्वस्त
गारपिटीमुळे अंदाजे एक लाख हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. शिवाय दोन हजार कोटींच्या निर्यातीला फटका बसला आहे. मराठवाड्यात नुकसानीचा आकडा जास्त आहे. आंबा, केळी, मोसंबी, डाळिंब आदी 90 टक्के फळे उद्ध्वस्त झाली आहेत. शासनाने संकटग्रस्त शेतकर्‍यांना मदत करावी. डॉ. भगवान कापसे, फलोत्पादकतज्ज्ञ.
मदत नको, कर्जमाफी द्या
दरवर्षी केशर आंबा व डाळिंब विदेशात निर्यात करून 25 ते 30 लाखांपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या वर्षी पर्जन्यमान्य चांगले असल्याने यंदा 60 लाखांचे उत्पादन अपेक्षित होते. पण गारपिटीने बाग उद्ध्वस्त झाली. शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी. त्र्यंबक पाथ्रीकर, फलोत्पादक शेतकरी.
प्रचंड नुकसान
विभागनिहाय शेतीपिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान वेगळे आहे. त्याचे पंचनामे करून सत्य आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच अधिकृत आकडेवारी कळेल. मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. निर्यातीवर याचा निश्चितच परिणाम होईल. उमाकांत दांगट, आयुक्त, राज्य कृषी विभाग, पुणे.