आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Gopinath Munde Cleared Lok Sabha Seats Issue

मराठवाड्यात युतीच्या जागांत बदल नाही - गोपीनाथ मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जागावाटपात युती कोणताही बदल करणार नाही, असे भाजप नेते, खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच मनसेसोबत लोकसभा आणि विधानसभेत कोणतीही युती केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


मराठवाड्यात सध्या भाजपमध्ये अनेक पक्षांतील पदाधिकारी येत आहेत. आघाडीने आमच्या मित्रपक्ष शिवसेनेचे दोन खासदार फोडले आहेत. भाजपमध्येही येणार्‍यांची यादी वाढत आहे; पण बीडमधून आता कोणाला प्रवेश दिला जाणार नाही. असे ते म्हणाले.


लोकसभेत मनसेसोबत युती करणार का, असे विचारले असता ते म्हणाले, कोणत्याच निवडणुकीत मनसेसोबत युती केली जाणार नाही. काँग्रेसला पराभव अटळ दिसत असल्यामुळेच खुर्शीद नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. खुर्शीद यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. नामांतराच्या लढय़ातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.


कोणताही उमेदवार दिला, तरी मी घाबरणारा नाही
भाजपने पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून सभा घेण्यास सुरुवात केली आहे. इचलकरंजीमध्ये आम्ही पहिली सभा घेतली. त्यामुळे बीडमध्ये मला अडकवून ठेवण्यासाठी कोणताही उमेदवार दिला तरी काहीच फरक पडणार नाही, असे सांगत मी घाबरणारा नेता नाही, असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले.