वैजापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी ४६ मतदारसंघांसाठी १७० इच्छुकांनी मुलाखती दिल्या.यात वैजापूर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे जलि्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, कल्याण दांगोडे, राजेंद्र पाटील चव्हाण, सतीश शिंदे यांच्या मुलाखती झाल्या. विशेष म्हणजे मुलाखत देणाऱ्यांमध्ये कॉँग्रेसचे पदािधकारी जे. के. जाधव यांचा समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी १ दिवसासाठी हत्तीवर बसून दलि्ली गाठू पाहणारे जे. के. जाधव आता इंजिनमध्ये बसून मुंबई गाठण्याच्या तयारीत आहेत. बसपाने त्यांची लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर केली होती. मात्र, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांना विधान परिषदेचे गाजर दाखवून हत्तीवरून उतरवले होते. त्यामुळे ते कॉँग्रेसमध्ये परतले होते.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच त्यांनी मतदारसंघात वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क सुरू केला होता. मात्र, कॉँग्रेसचे प्रबळ दावेदार डॉ. दिनेश परदेशी यांनी त्यांना शांत बसवले होते. दरम्यानच्या काळात देशात कॉँग्रेसची झालेली वाताहत पाहता जे. के. जाधव यांनी पुन्हा एकदा नवीन आसरा शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर जे. के. जाधव यांनी मनसेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून सोमवारी त्यांनी मुलाखत िदल्याचे समजते. या मुलाखतीत जाधव यांना कॉँग्रेसकडून उमेदवारी का मागत नाहीत, असे िवचारण्यात आले.
यावर वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याचे त्यांनी सांिगतले. मुलाखतीनंतर जाधव यांना काहीही प्रत्युत्तर आले नाही. यािवषयी जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क
होऊ शकला नाही.