आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Lok Sabha Election, Builet,Divya Marathi

निवडणूक काळात बाराशे जणांची पिस्तुले जमा होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभा निवडणूक तटस्थ, पारदर्शक आणि भयरहित पार पडावी म्हणून 1200 परवानाधारकांची पिस्तुले मार्चअखेर पोलिस मुख्यालयात जमा होतील. मात्र, खरोखर जिवाला धोका असणार्‍यांना पिस्तूल बाळगण्यास पोलिस आयुक्तालयातील समिती मंजुरी देईल, अशी माहिती पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिली. निवडणूक आयोगाने 5 मार्च रोजी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. 16 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर 28 मेपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. यादरम्यान निवडणूक काळात सर्वांची पिस्तुले जमा करून घेण्याचे आदेश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील परवानाधारकांची पिस्तुले जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने जमा करून घेतली जातील. तर शहरातील पिस्तुले जमा करण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वातील समिती पाठपुरावा करणार आहे. राजेंद्र सिंह पुढील आठवड्यात यासंबंधी बैठक घेतील. पिस्तुले जमा करण्याची प्रक्रिया 29 मार्चपासून सुरू होईल.
शिथिलतेचा निर्णय घेऊ
शहरातील पिस्तूलधारकांकडून त्यांचे पिस्तूल जमा करण्यासाठी आढावा समितीची पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. ज्यांना शस्त्र बाळगणे अत्यंत गरजेचे आहे किंवा ज्यांच्या जीवितास धोका आहे असे व्यापारी, रोकड बाळगणार्‍यांकडे पिस्तूल कायम ठेवण्यासंबंधी विचार होऊ शकतो. मात्र, निवडणुका अत्यंत पारदर्शक आणि निर्भीडपणे व्हाव्यात म्हणून अधिक संख्येने पिस्तुले जमा करण्यात येतील. -राजेंद्र सिंह, पोलिस आयुक्त
व्यावसायिकांची संख्या अधिक
परवानाधारक पिस्तूल वापरणार्‍यांमध्ये सर्वाधिक संख्या व्यावसायिक, उद्योजकांची आहे. त्याशिवाय राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक, लष्करातील निवृत्त अधिकारी-कर्मचारी, निवृत्त पोलिस अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, मोठे ठेकेदार, उद्योगपती, व्यापारी, सराफा, बिल्डर्स यांच्याकडे पिस्तुले आहेत. पैशांची वाहतूक करणारे, सर्वाधिक आयकर भरणारे करदाते तसेच जीविताला धोका असलेल्या परवानाधारकांना पिस्तुले बाळगण्यास परवानगी आहे. मात्र, यापैकी बहुतांश जणांना आपले पिस्तूल जमा करण्याचे बंधन आहे.