आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014

कन्नडमध्ये निवडणूक आयोगाची एक खिडकी योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - विधानसभा मतदारसंघात एक खिडकी योजना कार्यान्वित झाली आहे. या कक्षासाठी एक अधिकारी व १२ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या खिडकीतून वाहन परवाना, सभा भरवण्यासाठी परवाना, मिरवणूक परवाना, वाद्य-स्पीकरचा परवाना यासह विविध परवाने दिले जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजीव नंदकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सुधळकर यांनी दिली.

कोणत्याही परवानगीसाठी ४८ तास अगोदर अर्ज करणे आवश्यक असून परवानगी अर्ज दाखल केल्यानंतर परवानगी ७ दिवस अगोदर मागता येणार नाही. तसेच निवडणुकीसंबंधात विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ०२४३५-२१३३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही नंदकर यांनी केले. जाहीर सभा घेण्यासाठी नगर परिषद किंवा ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्तेचा उतारा तसेच खासगी मालमत्तेत असल्यास मालकाचे संमतीपत्र व सातबारा उतारा आदी प्रमाणपत्रे सादर करावीत. प्रचार कार्यालयासाठी जागा मालकाचे करारपत्र, मालकीचे पुरावे, नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीचे ना हरकत व प्रतिज्ञापत्र, नकाशा, चतुःसीमा आदी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तर वाहन परवान्यासाठी वाहनाचे इन्शुरन्स, ड्रायव्हर लायसन्स, गाडी मालकाचे संमतीपत्र, आरसी बुक व गाडी सुस्थितीत असल्याचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. या वेळी प्रभाकर मनगटे, चव्हाण, विकास वाघ, सय्यद आदी उपस्थित होते.