आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Makrand Dandvate, Divya Marathi

पाण्याच्या डोहांमुळे गावात आनंद तरंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुक्काम पोस्ट अकोलादेव. तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. गावात प्रवेश करताच छोट्याशा पुलावर गाडी थांबली. पुलाच्या खाली नाला असेल वाटले, पण वास्तविक स्वच्छ, निर्मळ खंडोबाचा ओढा. गावात आणखी फेरफटका मारला. सगळीकडे छोटे-छोटे पाण्याचे डोह. गावात शेतीची कामेही नित्यनेमाप्रमाणे सुरू. पावसाने दडी मारल्यामुळे यंदा पुन्हा मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असताना अकोलादेव या छोट्याशा गावात हिरवाईने नटलेली शेती पाहून आश्चर्य वाटते. आज गावातील पिण्‍याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
दोनच वर्षांपूर्वी मराठवाड्यात दुष्काळ पडला होता. जालना जिल्ह्यास त्याचा सर्वाधिक फटका बसला. सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या अकोलादेव गावातील २५० एकर मोसंबी शेतकऱ्यांनी तोडून, मोडून टाकली. लहान-मोठ्या शेतकऱ्यांनाही रोजगार हमी योजनेवर कामावर जावे लागत होते. रोहयो मजुरांची संख्या ५०० वर गेली. उभ्या पिकांनी मान टाकली. पणि्याच्या पाण्याची बोंब असल्याने गावातही दररोज हंडाभर पाण्यासाठी वादविवाद, तंटेबखेडे होत होते.
गावात दररोज टँकरच्या फेऱ्या सुरू होत्या. गावकरी सैरभैर झाले असताना त्यांच्या मदतीला धावून आले नैसर्गिक बंधारे अर्थात डोह मॉडेल. यवतमाळचे दिलासा संस्थेचे संचालक मधुकर धस, साताऱ्याचे ज्येष्ठ समाजसेवक आणि विहीर जोड प्रकल्पाचे प्रणेते डॉ. अवनिाश पोळ,औरंगाबादचे आनंद असोलकर, निश्चल शेंडे केअरिंग फ्रेंड्सचे कार्यकर्ते मुंबईचे निमेशभाई शहा यांनी अकोलादेव गावकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आणि गावाचा कायापालट झाला. गावातून वाहणारी जीवरेखा नदी, त्यावर असलेले छोटेसे धरण, खंडोबाचा ओढा, ...गावातील ४०० वििहरी, जवळच्याच गणेशपूर गावातील ५० विहिरींमध्ये आजही पाणी आहे. गतवर्षी मार्च २०१३ मध्ये एकूण पावसाची नोंद १४२ मि.मी. इतकीच होती. धरण आटलेले. जीवरेखा नदीचे पात्र गाळाने भरल्याने अरुंद झाले होते, परंतु गावकऱ्यांना मदतीचा हात मिळताच जीवरेखा तलावातून गाळ काढणे व नदीपात्राचे खोलीकरण सुरू झाले.
दोन पोकलँड मशीनचा वापर करत गावकऱ्यांनी व शेजारच्या बुटखेडा, देळेगव्हाण, गणेशपूर, टेंभुर्णी गावातील शेतकऱ्यांनी श्रमदान करून एकूण ६०० एकरपर्यंतचा गाळ स्वत:च्या शेतात टाकून घेतला.

सामाजिक परिवर्तन : डोह मॉडेलमुळे जीवरेखा धरणाची पाणी क्षमता ३५ कोटी लिटर वाढली. पात्रातील डोह मॉडेलमुळे दहा कोटी लिटर, खंडोबाचा ओढ्याची क्षमता ७ कोटी लिटर झाली आहे. गावातील पाणी क्षमता एकूण ५२ कोटी लिटरवर गेली.

गावकऱ्यांचा पुढाकार : गावातील गटशेतीप्रमुख मधुकर सवडे, भावराव आटपळे, रामराव मोढेकर, ज्ञानेश्वर जाधव, रामदास जाधव, दादाराव सवडे, महादू सवडे यांनी पुढाकार घेतला होता.

काय आहे डोह मॉडेल?
नदीपात्रात सुमारे ५०० फूट लांब, १५० फूट रुंद व २१ फूट खोलीचे असे पाच डोह तयार करण्यात आले. छोटे-छोटे डोह तयार करून ते एकमेकांना जोडण्यात येतात. त्यामुळे पाणी जमनिीत मुरते व त्याचबरोबर विहिरींमध्येही पाणीपातळी कायम राहण्यास मदत होते. एका डोहामुळे जवळपासच्या सुमारे एक किलोमीटर परिसरातील पाण्यात सहापट वाढ होते.

पाण्याचा प्रश्न मिटला
गेल्या वर्षी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. परंतु डोह मॉडेलमुळे पावसाळ्यात गावातील 40 विहिरी तत्काळ भरल्या होत्या. यंदा मात्र 110 विहिरींमध्ये आजही पाणी आहे. टँकरची गरज पडत नाही. पावसाने दडी मारली असली तरी पिण्‍याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
मधुकर सवडे, गटशेती प्रमुख