आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देण्याची वेळ आली, तर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष; माणिकराव ठाकरेंना कार्यकर्त्यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भाषणे ठोकून कार्यकर्त्यांना आपलेसे करता, तसे कार्यकर्त्यांनाही समजून घ्यावे. सर्व काही देण्याचे बोलता, सभा झाल्यावर आम्हाला काहीच मिळत नाही, यासह अनेक आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत बुधवारी केले.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ राहुल गांधी यांच्या दौर्‍याने होत आहे. प्रचाराची पहिली सभा औरंगाबादेत होत आहे. यानिमित्त मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची विंडसर कॅसल हॉटेलमध्ये माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी ठाकरे म्हणाले, सभेसाठी कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. पुढील दोन दिवसांत ब्लॉक व प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. सिडको ब्लॉक अध्यक्ष बबन डिडोरे यांनी बैठका घेऊन तुम्ही भाषणे ठोकून आदेश देता. प्रत्यक्षात काही देण्याची वेळ आली तेव्हा आमचे पदाधिकारी अंग काढून घेतात. सभेला कार्यकर्ते आणायचे असतील तर आम्हाला गाड्या द्या, नसता आम्ही भार पेलू शकणार नाही, असे स्पष्ट केले. हिंगोली येथील एका वृद्धाने आम्हाला नेताच नाही, हिंगोलीची गाडी कशी हाकणार, असा सवाल केला. गांधेलीच्या सरपंचांनी सभेसाठी बॅनर, झेंडे द्या, अशी मागणी केली. ठाकरे यांनी बैठक आटोपती घेत विमानतळ गाठले.