आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Marriage Ceremony Hall, DB Star

शहरातील 40 मंगल कार्यालयांत त्या तिघांनी लावले जनजागृतीचे फलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नसमारंभात होणारी अन्न पदार्थांची नासाडी थांबावी यासाठी शहरातील तीन ज्येष्ठ नागरिकांनी
पुढाकार घेतला आहे. डीबी स्टारने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अन्न नासाडीविरुद्ध अभियानाचे स्वरूप आले आहे. गेल्या महिनाभरात शहरातील 60 पैकी तब्बल 40 मंगल कार्यालयांमध्ये त्यांनी अन्ननासाडी न करण्याबाबत जनजागृती करणारे फलक लावले आहेत. त्यांच्या या मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
एकीकडे लाखो लोक अर्धपोटी तर तितकेच लोक उपाशी आहेत. दुसरीकडे लग्न समारंभ तसेच अन्य कार्यक्रमात अन्नाची भरमसाट नासाडी होते. उरलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट न लावता ते फेकून दिले जाते. मुळात अशी नासाडी होऊ देऊ नये. त्यातून अन्न उरले तर ते उपाशी लोकांना वाटले जावे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच वसंत मोताळे. डॉ. रोहिणी पिसोळकर आणि नारायण वैद्य या ज्येष्ठ नागरिकांनी जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे.


नागरिकांचा भरभरून प्रतिसाद
डीबी स्टारने 5 जानेवारी 2014 रोजी या अनोख्या अभियानाला ‘मोह टाळा,अन्न वाचवा’ या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध करून या महत्त्वाच्या विषयाला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली. त्यानंतर अनेक वाचकांसह सर्वसामान्य नागरिक तसेच संस्था व संघटनांनी या अभियानाला भरभरून प्रतिसाद दिला.


फलक लावले
अनंत मोताळे यांनी स्वत: लोडिंग रिक्षा भाड्याने घेऊन अन्ननासाडीबाबत प्रबोधन करणारे मोठे फलक शहरातील 40 मंगल कार्यालयात लावले. या कामी कार्यालयाच्या मालकांनी खूप सहकार्य केले व या उपक्रामाचे कौतुकही केले.


देवगिरी बँकेची मदत
अनंत मोताळे यांनी ज्येष्ठ नागरिकांची एक टीमच तयार केली आहे. त्यात नारायण वैद्य, डॉ. रोहिणी पिसोळकर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. हे लोक अनेक बँका व स्वयंसेवी संस्थाकडे अन्न नासाडीबाबत जनजागृती करणारे फलक तयार करण्यासाठी मदत मागण्यास गेले. त्यातून अनेक दानशूर पुढे आले. देवगिरी नागरी सहकारी बँॅकेनेही या मोहिमेचे कौतुक करीत पाच फलक दिले. पीएमसी बँकेनेही बोर्ड तयार करून देण्याची तयारी दाखवली.


उरलेले अन्न उपाशी लोकांना वाटणार
मंगल कार्यालयात जेवणावळीनंतर उरलेले अन्न आम्ही गोळा करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आम्हाला कार्यालयांसह सामान्य नागरिकांचे सहकार्य हवे. कुठेही अन्न उरले तर आम्हाला फोन करावा आम्ही ते घेऊन उपाशी लोकांना वाटू.
-अनंत मोताळे, ज्येष्ठ नागरिक व अभियानाचे प्रमुख