आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - व्यावसायिक हेव्यातून सहकार्याचा गळा आवळून खून करून त्याचे प्रेत गौताळा अभयारण्यात फेकणार्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. मकसूद कॉलनीतील शेख मुदस्सर शेख खाजामियाँ याचा गॅसबत्तीमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय आहे. तिघांसोबत मिळून तो हा व्यवसाय करत असे. आरोपी सय्यद सादिक शेख आरेफ (25 रा. गल्ली नं. 15 बायजीपुरा इंदिरानगर), सय्यद अकबर सय्यद अमीर (30, रा. गल्ली नंबर 20 बायजीपुरा) व महंमद साजिद महंमद खालेद (22 रा. कैसर कॉलनी औरंगाबाद) या तिघांनी 13 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुदस्सर याच्या फोर्ड आयकॉन कारमध्ये संगनमताने दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत त्याच्याच कारमध्ये टाकून कन्नडजवळील गौताळा अभयारण्यात टाकून दिल्याची कबुली तिघा आरोपींनी पोलिसांना दिली.
सदरची कारवाई पोलिस उपायुक्त जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल नसीम खान, भावराव गायके, विजयानंद गवळी, धीरज काबलिये, प्रदीप शिंदे, विशाल सोनवणे, संतोष बोडखे आदींनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.