आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Murder, Divya Marathi

मित्राने केला 2 हजारांसाठी खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जोगेश्वरी शिवारातील ड्रेनेजलाइनमध्ये मृतदेह टाकणार्‍या आरोपीचा अवघ्या पाच दिवसांमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला आहे. आरोपीला वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


वाळूज एमआयडीसी येथील ड्रेनेजलाइनच्या ढाप्यामध्ये कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह गुरुवारी (6 मार्च) सकाळी आढळला होता. या संदर्भात उपनिरीक्षक सुरेश खाडे यांनी तपास केला असता कोणताच पुरावा आरोपीने ठेवला नव्हता. मात्र, पोलिसांना मृताची ओळख पटली होती. मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय अनंतलाल चंद्रबली चौहान याचा तो मृतदेह होता.


गुन्हे शाखेने केला तपास : सदरील खुनाचा तपास औरंगाबाद गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. संतोष चौहान याच्याकडून मृत अनंतलाल यास काही पैसे येणे होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यात संतोष हा घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर काम करतो, अशी माहिती मिळाल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. मंगळवारी संतोष चौहान यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने खुनाची क बुली दिली. सदरील कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक उन्मेश थिटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल नजीम खान, पोलिस नाईक भाऊराव गायके, पोलिस कॉन्स्टेबल विजयनंद गवळी, प्रदीप शिंदे, धीरज काबलिये, विशाल सोनवणे, संतोष बोडखे आदींनी पार पडली. मृत व आरोपी एकाच गावातील असून ते नातलग असण्याची शक्यता पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी वर्तवली आहे.


गुन्हे शाखेकडे कबुली
घटनेच्या दिवशी 24 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अनंतलाल संतोषकडे पैशांची मागणी करण्यासाठी आला. तेव्हा दोघांत बाचाबाची झाली. या वेळी राग अनावर झाल्याने संतोषने अनंतलालचे डोके ओट्याच्या फरशीवर आदळले. त्यातच अनंतलालचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी संतोषने मृतदेह ड्रेनेजमध्ये टाकला, अशी कबुली संतोषने गुन्हे शाखेकडे दिली आहे.