आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, National Science Day

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: टेस्ट ट्यूबमध्ये फुलल्या उपयोगी वनस्पती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात नामशेष होणा-या वनस्पतींचे ऊती संवर्धन केले जात आहे. वीस प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड करता येईल असे संशोधन येथील प्रयोगशाळेत झाले आहे. या संशोधनातून कावीळ, मधुमेह व मुतखड्यासारख्या आजारांवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न होत आहे. मोजकेच प्राध्यापक असतानाही पेटंट मिळवून जगभरात विद्यापीठाचे नाव झळकवण्याचा प्रयत्न हा विभाग करत आहे. जागतिक विज्ञान दिनानिमित्त डीबी स्टारने त्यावर टाकलेला प्रकाश...


भारताला आयुर्वेदाची प्राचीन परंपरा आहे. देशभरात आयुर्वेदिक वनस्पतींचा खजिनाच होता; पण काळाच्या ओघात त्यावर सखोल संशोधन न झाल्याने अनेक वनस्पती नामशेष होत आहेत. अशा काही उपयोगी वीस प्रकारच्या वनस्पतींचे पुनरुज्जीवन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील टेस्ट ट्यूबमध्ये केले जात आहे. मराठीत या प्रयोगाला ऊती संवर्धन, तर इंग्रजीत टिश्यू कल्चर असे म्हणतात. नामशेष झालेल्या झाडांचे बियाणेच सापडले पाहिजे असे नाही, तर त्या झाडाचे खोड, पान, फांदी अथवा परागकण जरी सापडले तरी त्या दुर्मिळ झाडाचा पुनर्जन्म विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेत केला जाऊ शकतो. गेल्या 10 वर्षांपासून वीस वनस्पतींचे संवर्धन करण्यात आले आहे.

पुढे वाचा महत्त्वाच्या वनस्‍पतींविषयी.........