आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Pune Bomb Blast, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे स्फोटाचे औरंगाबाद कनेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - पुण्यातीलपोलिस ठाण्यासमोरील बॉम्बस्फोट प्रकरणाचे कनेक्शन औरंगाबादपर्यंत आहे. या प्रकरणात वापरलेले मोबाइल समिकार्ड रांजणगाव शेणपुंजीमधील जयभद्रा मोबाइल शॉपीतून विकत घेतले होते. ग्राहकाची कागदपत्रे वापरून अनोळखी माणसाला समिकार्ड विकणाऱ्या प्रकाश गलांडे (३०), टाटा डोकोमो कंपनीचा अॅक्टिव्हेशन अधिकारी सय्यद आसिफ सय्यद अब्बास (३७) यांना रविवारी अटक करण्यात आली. सोमवारी गंगापूर न्यायालयाने दोघांना सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

१० जुलै २०१४ रोजी स्फोट झाला होता.औरंगाबाद एटीएसचे पोलिस निरीक्षक एच. एम. मुंढे यांच्या अर्जावरून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

एटीएसच्या अर्जानुसार गुन्हा
७२७६८०२६१२ या मोबाइल नंबरचे समिकार्ड वाळूजमधून घेतल्याचे उघड झाल्यावर औरंगाबाद एटीएसकडे येथील तपासाची सूत्रे सोपवण्यात आली. एटीएसच्या तपासात समिकार्ड जुलै २०१४ रोजी अॅक्टिवेट करण्यात आल्याचे उघड झाले. वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे अधिक तपास करत आहेत.
अशी केली हेराफेरी
वाळूजमधीलतानाजी धोंडीबा घाईट (मूळ रा. नरला ता. फुलंब्री) यांनी सहा महिन्यांपूर्वी रांजणगाव शेणपुंजीतील गलांडे यांच्याकडून आयडियाचे समिकार्ड घेतले. त्या वेळी त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स दोन पासपोर्ट साइज फोटो दिले होते. याच कागदपत्रांचा आधार घेत प्रकाशने अनोळखी व्यक्तीला समिकार्ड विकले. घाईट यांनी कागदपत्रे ओळखली, पण स्वाक्षरी मात्र दुसऱ्याची असल्याचे पोलिसांना सांगितले. नंतर अधिक तपास केला असता प्रकाश याने समिकार्ड अनोळखीला विकल्याचे स्पष्ट झाले होते.