आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Rajendra Singh, Police Commissioner, Divya Marathi

पालकांनो सावधान ! अल्पवयीन मुलांकडे वाहन दिल्यास होईल कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सतरावर्षीय बालकाने 5 एप्रिलला सुसाट कार चालवत तीन दुचाकींसह उभ्या कारला धडक दिली होती. पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून यापुढे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी देणार्‍या पालकांवर कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. शहरातील 12 नवीन ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपाला पूर्वसूचना देण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना सिंह म्हणाले, सध्या वाहतूक शाखेत 250 पोलिस कर्मचारी आहेत. वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी ही संख्या तोकडी आहे. यात वाढ होणे गरजेचे आहे. ठिकठिकाणी सिग्नल असल्यास वाहतुकीला शिस्त लागू शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सहाशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात दहा भरारी पथके असून त्यांच्याकडून दररोज सुमारे एक हजार वाहनांची कसून तपासणी केली जात असल्याचे सिंह यांनी सांगितले. सोमवारी हसरूल तलावात चार युवकांचा दुर्दैवी अंत झाला. याचा आवर्जून उल्लेख करत आयुक्त म्हणाले, असले प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांनी तलावाची पाहणी केली आहे. महापालिकेला योग्य त्या सूचनादेखील दिल्या जाणार आहेत. तलावाचे क्षेत्रफळ 20 वर्ग किलोमीटर असल्याने दिवसा पोलिस गस्त घालतील अशी उपाययोजना केली जाईल. मात्र महापालिकेनेदेखील तलावाच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज आहे.
निवडणुकीसाठी अशी असेल कुमक
3928 शहरातील मतदान केंद्रे
3500 - होमगार्ड मागवण्यात आले (400 पुरुष तर 100 महिला कर्मचारी)
303 - उपायुक्त
304 - सहायक पोलिस आयुक्त
328 - पोलिस निरीक्षक
33100 - पोलिस कर्मचारी
3118 - जुनी व नवी वाहने आयुक्तालयाकडे
345 : आणखी वाहनांची मागणी
3 06 - राज्य राखीव दलाच्या तुकड्या निवडणुकीदरम्यान मागवल्या
700 जणांची पिस्तुले हस्तगत
शहरातील 1108 जणांना अग्निशस्त्रांचे परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी 700 जणांची पिस्तुले (अग्निशस्त्रे) हस्तगत करण्यात आली आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा जसे की, एटीएम आणि बँकांमधील सुरक्षा रक्षकांना अग्निशस्त्रे वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.