आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधमांने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इंदिरानगर (गारखेडा) येथे राहणार्‍या दीपक जगताप (21) या नराधमाने स्वत:च्या घरात भाडेतत्त्वावर राहणार्‍या मजुराच्या साडेतीन वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. मुलीचे आई-वडील दोघेही मजुरीसाठी बाहेर गेलेले असताना सोमवारी त्याने घरात घुसून बालिकेवर अतिप्रसंग केला. दरम्यान, मुलीने ओरडल्यामुळे त्याचे बिंग फुटले.


घराबाहेर खेळणार्‍या मोठय़ा बहिणीने शेजार्‍यांना मदत मागितली. मुलीच्या खोलीबाहेर जमलेल्या जमावाने त्याला बाहेर काढून बेदम चोप दिला. त्यानंतर बालिका आणि आरोपीच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना घाटीत पाठवण्यात आले आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल ऑफेन्स अँक्टनुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक हेमंत कदम पुढील तपास करत आहेत.