आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Religious Quarrel, Arrest, Waluj

मुरमीत बांधकामावरून धार्मिक वाद; 25 गावकर्‍यांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वाळूजलगतच्या मुरमी (ता. गंगापूर)येथील एका धार्मिक स्थळावरील बांधकामावरून दोन गटांमध्ये वाद झाला. यामुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी दोन्ही गटांतील 25 गावकर्‍यांना अटक केली आहे. सध्या गावात शांतता आहे.


वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरमी येथील सार्वजनिक ठिकाणी एका धार्मिक स्थळाचे बांधकाम केल्यावरून सोमवारी (10 मार्च) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद झाला. या वादामुळे गावात अशांतता निर्माण होऊन गावकर्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी मुरमीत धाव घेत दोन्ही गटांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांना अखेर कारवाई करावी लागली. एका गटातील 12 तर दुसर्‍या गटातील 13 अशा 25 जणांविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. रणवीरकर यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक मारुती आंधळे क रीत आहेत.