आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Sanjit Singh, Heart Function, Lifeline, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंद पडलेले हृदय दीड तासाने सुरू झाल्याने संजित सिंग यांना मिळाले जीवनदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हृदय बंद पडल्यानंतर कार्डियो-पल्मोनरी रिसिटेशन (हाताने छातीचा मसाज) केल्यामुळे तब्बल दीड तासानंतर संजित सिंग वकील यांना जीवदान मिळाल्याचा दावा एमजीएम रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत उदगिरे यांनी केला. हृदय बंद पडल्यावर दीड तासाने ते सुरू झाल्याचे व रुग्ण जिवंत राहण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचा दावाही त्यांनी गुरुवारी रुग्णालयातील पत्रकार परिषदेत केला.


सिंग हे एमजीएम रुग्णालयातील सिटी स्कॅन विभागात कामाला असून 2 फेब्रुवारीला सकाळी सात वाजता रुग्णालयात काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या वेळी एक्स-रे विभागातील कर्मचारी सय्यद अली आणि त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्यावर कार्डिओ-पल्मोनरी रिसिटेशन करण्यास सुरुवात केली. यामुळे हृदयाचा कृत्रिम रक्तप्रवाह सुरूच राहिला. दीड तास ही प्रक्रिया अशीच सुरू होती. त्यादरम्यान सिंग यांच्या बरगडीचे हाड तुटले. पण दीड तासांनी त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत झाले. त्यानंतर डॉ. उदगिरे यांनी अँजिओग्राफी केली. त्यात रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाल्यामुळे रक्तप्रवाह बंद झाल्याचे दिसून आले.

पुढे वाचा ‘एक्स्पोर्ट कॅथेटर’ या प्रक्रियेविषयी....