आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्य जनतेचा मला पाठिंबा,आपचे उमेदवार सुभाष लोमटे यांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या 40 वर्षांपासून शेतकरी, हमाल, कामगारांच्या प्रश्‍नांवर आंदोलन करून अहोरात्र झटत आहे. त्या सर्व जनतेचा मला पाठिंबा आहे. हिच जनशक्ती माझा विजय निश्चित करेल, असा विश्वास आम आदमी पार्टीचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी व्यक्त केला. त्यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत किरण पाटील, हरमितसिंग, सय्यद अमजद, अण्णा खंदारे, सुभाष गायकवाड उपस्थित होते.


पक्षांतर्गत वादाचा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. कोणताही पक्ष जबाबदारी सोपवतो. कमाई व लाभचे पद देण्यासाठी पक्षात घेत नाही. पक्षाने जो निर्णय घेतला तो सर्वांनी मानायला हवा होता. पण तसे घडले नाही. त्या संदर्भात लोक विचार करतील असेही ते म्हणाले. जातपात, प्रांतभेद व भ्रष्टाचार करून सत्ता मिळवण्यासाठी आम आदमी पक्ष राहिला नाही, तर भ्रष्टाचारमुक्त भारत, जातीय सलोखा, बेरोजगारांना रोजगार, महिलांना सुरक्षा, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व शेतकर्‍यांना राजाचा दर्जा देण्यासाठी पक्ष लोकसभेच्या रिंगणात उभा असल्याचेही ते म्हणाले.


खैरेंनी मनपाच सांभाळली
खासदार चंद्रकांत खैरे यांनी संसदेपेक्षा महापालिका जास्त सांभाळली. त्यामुळे शहराची स्थिती दयनीय झाली असल्याचा आरोपही लोमटे यांनी केला. कामगारांना 200 रुपये पेन्शन अन् खासदारांनी त्यांच्या मानधनात भरघोस वाढ केली. त्या ऐवजी कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ केली असती तर त्याचा मोठा उपयोग झाला असता असेही ते म्हणाले.