आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Techniqual Education Department

एकाच दिवशी होणार दोन परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येणारी व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा राज्यभरात 15 आणि 16 मार्च रोजी होत आहे. याच वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाच्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. औरंगाबाद विभागात बीकॉम तृतीय वर्षाला शिकणार्‍या एक हजार विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता नेमकी कुठली परीक्षा द्यावी, या संभ्रमात विद्यार्थी आहेत.


21 नोव्हेंबर 2013 रोजी तंत्रशिक्षण विभागाकडून व्यवस्थापन शास्त्राच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. मात्र, याच कालावधीत विद्यापीठाच्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले.


नेमके 15 मार्च रोजी बीकॉमच्या तृतीय वर्षाचे मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉर्पोरेट अकाउंटिंग या दोन विषयांचे पेपर आहेत. त्यामुळे आता भवितव्याचा विचार करावा की पदवीची परीक्षा द्यावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. विद्यापीठाने एक हजार विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षेची तारीख बदलून द्यावी, अशी मागणी होत आहे.


अद्याप एकाही विद्यार्थ्याची तक्रार नाही
अद्याप एकाही विद्यार्थ्याची तक्रार माझ्याकडे आली नाही. मात्र, अशी समस्या घेऊन विद्यार्थी आले, तर त्याचा विचार केला जाईल. ही समस्या कुलगुरूंपर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यानंतर यावर निर्णय होईल. अशोक चव्हाण, परीक्षा विभागप्रमुख


एक वर्ष अगोदर तारखा जाहीर केल्या आहेत
शासनाने 21 नोव्हेंबर 2013 रोजीच ही परीक्षा जाहीर केली आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा विचार करून या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या अधिकार्‍यांशी यासंबधी चर्चा करू. महेश शिवणकर, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग