आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Unseasonal Rain, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवकाळी पावसाचा कहर सुरूच,रात्री साडेअकरापर्यंत 14 मिलिमीटर पावसाची नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी कोसळणार्‍या पावसाचा कहर सुरूच असून बुधवारी (12 मार्च) शहर व परिसरात सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. रात्री साडेअकरापर्यंत 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे नुकसानीचा आकडा फुगत आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने हवामानात अनपेक्षित बदल झाले आहेत. पूर्वेकडील वारे पश्चिमेकडे आणि पश्चिमकडील वारे पूर्वेकडे सरकत नसल्याने एका ठिकाणी ढग थांबतात आणि तेथेच पाऊस पडतो, हे गेल्या पंधरवड्यापासून दररोज सुरू आहे. बळीराजा त्रस्त झाला आहे. त्याच्या डोळ्यांतून अo्रुधारा वाहत आहेत. रोगट वातावरणामुळे अनके आजार बळावले आहेत. बाजारपेठेत सुप्त मंदीला सुरुवात झाली आहे. टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर वगळता इतर सर्वच भाज्यांचे भाव वाढत चालले आहेत. डागी धान्यांचे भाव कोसळले असून दर्जेदार धान्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकही चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे.