आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Unseasonal Rain, Halistorm

औरंगाबादेत कधी नव्हे ते मार्चमध्ये 48 मि.मी. पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या दहा दिवसांपासून अनपेक्षितपणे वादळी वार्‍यासह पाऊस आणि गारपिटीचा कहर सुरू आहे. रविवारीही जोरदार पाऊस झाल्याने शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. 9 मार्चपर्यंत 48.6 मिलिमीटर पाऊस झाला असून वातावरणातील बदलामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत मार्च महिन्यात असा पाऊस झाला नसल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.


सध्या प्रतितास दहा कि.मी. वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे पवननगर येथे 11 के.व्ही. विद्युत वाहिनीवर झाडांची फांदी पडल्याने मयूरनगर फीडर सायंकाळी पाच वाजेपासून बंद पडले. त्यामुळे नक्षत्रवाडी, मयूरनगर, छावणी, गारखेडा परिसर, जाधववाडी, मोंढा नाका आदी ठिकाणचा वीजपुरवठा तीन तास बंद होता. वातावरणात अचानक बदल होऊन बंगालच्या उपसागरावर बाष्प निर्माण होत असून पाऊस पडत असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. र्शीनिवास औंधकर म्हणाले.


मार्चमधील पाऊस मिलिमीटर
दिनांक पाऊस
0 3 26.6
05 2
0 6 24
08 2.6
0 9 15


दर 4 तासांनी बदल
हवेच्या दिशेने वाफ वाहत आहे. यामुळे गारपीट, वादळी पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्रात याचे परिणाम दिसून येत असून नाशिक जिल्ह्यातही गारपीट झाली. दर चार तासांनी हवामानात बदल होत आहे. पुढील चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहील. डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ.