आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad News In Marathi, Voter Register Compaign, Divya Marathi

शेवटच्या दिवशी दहा हजार मतदारांची नोंदणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आचारसंहिता जारी झाल्यानंतरच्या पहिल्या रविवारी आयोगाच्या वतीने विशेष मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली. यात 36 हजारांवर नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्यांना पुन्हा संधी मिळावी म्हणून शनिवारची (15 मार्च) पुन्हा निवड करण्यात आली. मात्र, या वेळी पहिल्यासारखा प्रतिसाद मिळाला नाही. गत रविवारी केंद्रांवर आलेलेच चेहरे आज पुन्हा पडताळणीसाठी आले होते. त्यांनी पुन्हा एकदा मतदान नोंदणी कर्मचार्‍यांशी वाद घातला.
18 वर्षांवरील प्रत्येकाचे नाव मतदार यादीत असावे यासाठी आयोगाने हे अभियान हाती घेतले आहे. गत रविवारी त्याला मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतरही यादीबाहेर असणार्‍यांची संख्या जास्तच असल्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा संधी देण्यात आली. रविवारी नोंदणी झालेली नावे यादीत आली का हे पाहणार्‍यांचीच संख्या जास्त होती. त्यामुळे अनेकांनी मतदार नोंदणी कर्मचार्‍यांशी वाद घातले. नावातील दुरुस्ती झाली नसल्याचे दिसून आल्यानेही नागरिकांनी संताप व्यक्त केला. गत रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. आज तसे चित्र नव्हते. दिवसभरात जिल्ह्यातील 2577 केंद्रांवर मिळून 10 हजारांपर्यंत अर्जाची नोंद झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. याचा अधिकृत आकडा उद्या संध्याकाळपर्यंत समजू शकेल. कर्मचार्‍यांकडून कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली.