आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad News On Divya Marathi Compaign, Vikas Manch Abhiyan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठीच्या वतीने गणेशनगरात आज विकास मंच अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दैनिक दिव्य मराठीच्या वतीने विकास मंच अभियान रविवारी सिडकोतील गणेशनगरात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता गणेशनगर वॉर्डातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डनमध्ये हा कार्यक्रम होईल. आतापर्यंत शहरातील बारा वॉर्डांत ‘तुमचे प्रश्न, तुमचा आवाज, शहराचा विकास’ या उद्देशाने विकास मंच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून अनेक नागरी समस्यांवर तोडगा निघाला असून नागरिकांना आपल्या समस्या थेट नगरसेवक व अधिकार्‍यांपर्यंत मांडण्याची संधी या व्यासपीठाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रविवारी होणार्‍या या कार्यक्रमात नगरसेविका प्राजक्ता भाले, वॉर्ड अधिकारी अंकुश लाड, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, वॉर्ड अभियंता एस. एल. पवार, पाणीपुरवठय़ाचे उपअभियंता अशोक पद्मे नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याबाबत रूपरेषा नागरिकांसमोर मांडतील.