आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद येथे भरदिवसा महिलेची वेणी कापल्याची घटना; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुंबई-पुणे पाठोपाठ  औरंगाबाद येथेही छावणी बाजार परिसरात एका महिलेची वेणी अज्ञाताने कापल्याची घटना घडली आहे. भरदिवसा वेणी कापल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिला आणि तिचा पती शुक्रवारी बाजारात गेले असताना एका अज्ञात व्यक्तीने महिलेची वेणी कापली. मात्र, घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान, याप्रकरणी छावणी पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुंबईतल्या भायखळा आणि वडाळामध्येही अशीच घटना घडली होती. यात तीन महिलांच्या वेणी कापण्यात आल्या होत्या. या घटनांमुळे महिलांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...