आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलटबाबा नगरीवासीय मूलभूत सुविधांपासून वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्डक्रमांक ८०, अंबिकानगर, मुकुंदवाडीअंतर्गत येणाऱ्या पायलटबाबानगरीतील रहिवासी गेल्या तीन वर्षांपासून समस्यांना तोंड देत आहे. सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी वाटप केलेले भूखंड सध्या महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेले आहे.
दोनशेपेक्षा जास्त भूखंड असलेल्या या भागात सध्या २० घरांची वस्ती आहे. या भागातील नागरिक वेळोवेळी मालमत्ता पाणीपट्टी कराचा भरणा करतात; परंतु त्यांना अजूनही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत.

पायलटबाबानगरीच्या बाजूने असलेल्या जालना रोडवरील सोहम मोटर्स ते अंबिकानगरमधून सर्व्हे नं. ५९ ६० या रस्त्यावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. याबरोबरच महालक्ष्मी चौक सर्व्हे नं. ६७ मुकुंदवाडी, सर्व्हे नं. ६८ ते जिजामाता कॉलनी या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून वसाहतीसाठी मोकळा रस्ता करून द्यावा. पायलटबाबानगरीत अजूनही डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात चिखलमय रस्ता होतो. त्यासाठी रस्त्याचे काम करण्यात यावे, अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आलेली नसून त्यामुळे नागरिकांना पाणी दूरवरून आणावे लागत आहे. वसाहतीच्या बाजूलाच मोकळ्या जागेत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करावी, कचरा टाकू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गरिबांची घरे तोडायची काय?
^पायलटबाबानगरीनवीन अधिकृत वस्ती आहे. येथील रहिवाशांना आम्ही पाणीपुरवठ्याची लाइन टाकून दिली असून ड्रेनेजलाइनही टाकून दिली आहे. रस्त्याचे डांबरीकरण मे महिन्यानंतर करण्यात येणार आहे. रस्त्यावरून चारचाकी जात नाही म्हणून काय, आम्ही गोरगरिबांची घरे तोडायची काय? वीस बाय तीस घरे आहेत. मास्टर प्लॅननुसार काम करायचे म्हटले, तर नागरिकांनी आयुक्तांकडे जावे. या वस्तीत कोणतेही अनधिकृत बांधकाम नाही. कमलनरोटे, नगरसेविका
पायलटबाबानगरी परिसरात रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे.
^नगरसेवकही या भागाकडे दुर्लक्ष करतात. आम्ही मालमत्ता कर भरूनही सुविधा मिळत नाही. बाळूशिंदे, रहिवासी

^अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना लांबून पाणी आणावे लागते. ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे. सफाई होत नाही. लक्ष्मणखांड्रे, रहिवासी

^आमच्या भागात रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. उघड्यावर शौचास बसतात. दुर्गंधी वाढलेली आहे. याकडे महानगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे. सोमीनाथकाळे, रहिवासी

^पावसाळ्यात जाण्या-येण्यासाठी सोयीचा रस्ता राहिलेला नाही. चारही बाजूंनी अतिक्रमणे वाढली असल्यामुळे चारचाकी वाहने येऊ शकत नाहीत. संदीपरावते, रहिवासी