आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौपदरीकरणाचा खर्च दुप्पट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील पाच वर्षात औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या कामाचा खर्च 184 कोटी रुपयांनी वाढला आहे. वर्ष 2007 मध्ये रस्त्याच्या चौपदरीकरणाचा खर्च 150 कोटी रुपये निर्धारित करण्यात आला होता. रस्त्याचा प्रस्ताव नव्याने राज्याच्या पायाभूत सुविधा समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येत आहे. आता रस्त्यासाठी 334.67 कोटी रुपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला आहे.
या कामात फेरबदल केल्यानंतर दुसºयांदा हा प्रस्ताव समितीसमोर ठेवला जात आहे. औरंगाबाद-पैठण व औरंगाबाद-फर्दापूर या दोन्ही रस्त्यांवर अंदाजित 951.67 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जूनमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीची बैठक होणार आहे. समितीमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह इतर मंत्र्यांचा समावेश आहे. समितीसमोर राज्यभरातून 10 रस्त्यांच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद-पैठण व औरंगाबाद-जळगाव रस्त्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. औरंगाबाद जळगाव हा रस्ता फर्दापूरपर्यंत घेण्यात आला आहे. रस्ते बीओटी तत्त्वावर केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून तयार करण्यात येणार आहेत.
रस्त्याची सद्य:स्थिती - मूळ प्रस्ताव औरंगाबाद-पैठण एवढ्याच लांबीसाठी होता. त्यास मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने 26 डिसेंबर 2007 रोजी मान्यता दिली होती. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या व्याप्तीनुसार निविदा बोलावण्यात आली. त्यास केवळ एकाच कंत्राटदाराने प्रतिसाद दिला. त्यामुळे निविदेस महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली नाही. रस्त्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च निर्धारित केला होता. पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणासह आता वाळूज-वाल्मी या 5.20 किमी लांबीच्या रस्त्याचेही चौपदरीकरण होणार आहे.
टोलनाका सरकणार : रस्त्यावरील टोलनाका अलीकडे सरकविण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वीच्या नाक्याऐवजी आता वाल्मी संस्थेजवळ वाळूज आणि पैठण रस्त्याच्या टी पॉइंटवर टोल नाका उभारण्याचा प्रस्ताव आहे.
तांत्रिक मान्यता- सुधारित अंदाजपत्रकानुसार 617 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
रस्त्याची लांबी-99 कि.मी.
सिल्लोड गावात ग्रेड सेपरेटर बांधणे-1
फुलंब्री, आळंद, गोळेगाव व अजिंठा गावात भुयारी मार्ग बांधणे-4 नग
सिव्हिल बांधकामाची किंमत : 495 कोटी
प्रस्तावित सवलतीचा कालावधी : 30 वर्षे ( 2 वर्षे बांधकाम कालावधीसह)
शासन सहभाग : 36 टक्के ( केंद्र 20 टक्के व राज्य 16 टक्के)
केंद्र : 115.80 कोटी व राज्य 130.64 कोटी ( टोलनाका ताब्यात घेणे, भूसंपादन व सेवा वाहिन्यांचे स्थलांतर)
प्रस्तावित टोलनाके : सावंगी (ता. औरंगाबाद) व पालोद (ता. सिल्लोड)
रस्त्याच्या कामाचे विश्लेषण - रस्त्यासाठी 334.67 कोटी रुपयांच्या कामाची तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
रस्त्याचा बांधकाम कालावधी-2 वर्षे
सवलतीचा कालावधी-23 वर्षे (बांधकाम कालावधी वगळून)
प्रस्तावित शासन सहभाग
-33 टक्के
केंद्र शासन-20 टक्के (58.57 कोटी)
राज्य शासन-13 टक्के
(79.87 कोटी)
अस्तित्वातील टोलनाका ताब्यात घेणे-41.80 कोटी
महाराष्ट्र शासनाचा एकूण सहभाग : 121.67 कोटी
औरंगाबाद-अजिंठा-फर्दापूर रस्त्याचे चौपदरीकरण
असा आहे प्रस्ताव
रस्त्याची लांबी: औरंगाबाद पैठण : 45.855 कि.मी.
वाळूज ते वाल्मी :
5.20 कि.मी.
कामाची व्याप्ती
मोठे पूल-3, लहान पूल-29, नळकांडी पूल बांधकाम-37 नग, बस वे व संगमस्थान सुधारणा-32 नग, भुयारी मार्ग-2 नग
वाळूज वाल्मी : मोठे पूल-1, लहान पूल-4, नळकांडी पूल-3, बस वे बांधकाम 1, संगमस्थान सुधारणा-2
रस्त्याच्या कामास केंद्राची पायाभूत समिती मान्यता प्रदान करते. त्यानंतर देशस्तरावर जाहिरात काढून निविदा काढण्यात येतात.
आर.बी. मोगल, उपअभियंता, सा.बां. विभाग