आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Passport Office 700 Application Pending

455 पासपोर्ट प्रकरणे निकाली; 700 अर्जांमध्ये अनेक त्रुटी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: विदेशात जाण्यासाठी लागणार्‍या पासपोर्टसाठी 2010 पासून हजारो नागरिकांनी अर्ज केले होते. यापैकी 700 अर्ज अनेक त्रुटींमुळे क्षेत्रीय कार्यालयात पडून होते. त्याचा निपटारा करण्यासाठी तसेच विशेष शाखेचे सर्व पोलिस कर्मचारी व सर्व प्रभारी अधिकारी यांना पासपोर्टसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय, मुंबईच्या वतीने शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) पोलिस आयुक्तालयात करण्यात आले होते. यात 455 अर्जांचा निपटारा करण्यात आला असून या नागरिकांना पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
क्षेत्रीय कार्यालयाने त्रुटीमुळे अर्ज पडून असलेल्या नागरिकांना शिबिराविषयी पत्राद्वारे माहिती दिली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून नागरिकांची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रांग लागली होती. क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने उपपासपोर्ट अधिकारी के. जे. शहा, पी. व्ही. धोत्रे, एस. एस. नलवाडे, ए. ए. ख्वाजा, पोलिस निरीक्षक सोपान बोरसे यांच्यासह कर्मचार्‍यांनी पासपोर्टसाठी लागणार्‍या कगदपत्रांची तपासणी करून नागरिकांना मार्गदर्शन केले.
खेट्या मारून नागरिक त्रस्त
शहरात क्षेत्रीय कार्यालय नसल्यामुळे स्थानिक पासपोर्ट कार्यालयात अर्जांची पडताळणी करून नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवण्यात येते. मात्र, अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास नागरिकांना त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई क्षेत्रीय कार्यालयात खेट्या माराव्या लागतात. पासपोर्ट वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक नागरिकांचे विदेशवारीचे स्वप्न भंगत होते. या शिबिरामुळे पारपत्रासाठी येणार्‍या अडचणीवर मात झाली.