आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज दुपारी दोनपर्यंत पेट्रोल पंप बंद राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एलबीटी (स्थानिक संस्था कर) विरोधात राज्यभरातील व्यापार्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने 14 मे रोजी बंद पुकारला आहे. औषधींचे ठोक विक्रेते त्यात सहभागी होणार असून पेट्रोल पंपही दुपारी दोनपर्यंत बंद राहणार आहेत.
सोमवारी बंदच्या पूर्वतयारीसाठी बैठक झाली. त्यात विविध विभागांसाठी महासंघाच्या प्रतिनिधींवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कापड, स्टेशनरी, प्लायवूड, किराणा, सुवर्णालंकार, मिठाई, प्रोझोन, रिलायन्स, इझी डे मॉलही बंदमध्ये सहभागी राहणार आहे. बंद यशस्वी करण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा, अजय शहा, मदनभाई जालनावाला, अखिल अब्बास आदी प्रयत्न करत आहेत. येणार्‍या नव्या करप्रणालीत इतर सर्व कर समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महासंघाचे प्रवक्ते राजन हौजवाला यांनी सांगितले.