आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Pilgrim Return From Uttarakhand Floods

PICS : आनंद, आक्रोश अन् अश्रूंचा महापूर! चारधामला गेले अकरा, परतला एक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावर सोमवारी दुपारी एकीकडे दु:खावेग, आक्रोश आणि विलाप,तर दुसरीकडे कुटुंबातील सदस्य सुखरूप परतल्याचा आनंद, असे विरोधाभासी आणि मन हेलावून टाकणारे वातावरण होते. कुणाचा मुलगा, सून, नातू, तर कुणाची आई आणि वडील प्रलयातून सहीसलामत परतले. मात्र, काहींना प्रलयाच्या कचाट्यात जीव गमवावा लागला. कुटुंबातील काही सदस्य परतले, तर काही गेले ते कायमचेच..!

सोमवारी (24 जून) दुपारी 4.30 च्या सुमारास जेट एअरवेजचे विमान आले तेव्हा नातेवाइकांना भेटण्याची अनावर ओढ त्यांच्या आप्तेष्टांना लागली होती. फुलांचे हार आणि पेढे घेऊन औरंगाबादेतील शेकडो कुटुंबीय नातेवाइकांच्या स्वागतासाठी विमानतळावर जमले होते. केदारनाथ, गौरीकुंड आणि रामबाडा येथे उघड्या डोळय़ांनी मृत्यूचे तांडव बघणारे भाविक सहीसलामत विमानातून उतरले आणि नातेवाइकांनी त्यांना कडकडून मिठय़ा मारल्या. काहींनी लहानग्या नातवांना अक्षरश: डोक्यावर घेतले. मुलगा, सून परतल्याचा आनंद झाला; पण अश्रू आवरत नव्हते. त्यांनी त्यांना आवेगात मिठीत घेतले. या वेळी विमानतळावर उपस्थित लोकही हे दृश्य बघून हेलावून गेले होते. सोमवारी सात कुटुंबांतील 27 जण औरंगाबादेत परतले.

रात्री साडेसातच्या विमानाने राजेश झंवर एकटेच परतले. 15 जूनच्या रात्री रामबाडातील नदीच्या वेगवान प्रवाहात दोन मुलांसह पत्नीला बुडताना राजेश यांनी पाहिले होते. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे आणखी आठ नातेवाईकही जिवास मुकले. राजेश विमानतळावर उतरले तेव्हा त्यांचा चेहरा निर्विकार होता. निराशेने त्यांना मुके बनवले होते. त्यांना मित्राने कडकडून मिठी मारली आणि तो मित्र धायमोकलून रडू लागला. पण राजेश यांच्या डोळय़ात टिपूससुद्धा नव्हता. त्यांची आपबिती धाकट्या भावाने पत्रकारांना सांगितली. राजेश यांचे बंधू गोपाल झंवर हरिद्वारला त्यांना आणण्यासाठी गेले होते.