आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौघे तस्कर जाळ्यात; दोघे निसटले, वाघाची कातडी नेणारा अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तस्करीसाठी औरंगाबादला आणलेली वाघाची कातडी पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सायंकाळी सिल्लेखान्याजवळ पकडली. याबाबत क्रांती चौक पोलिसांनी स्वत: फिर्याद दाखल करून कातडी नेणा-या रवींद्र श्रीहरी अधाने (३३, रा. गल्ली नं. ३, कैलासनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. बाजारात कातडीची किंमत २४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जालन्याहून शहरात वाघाची कातडी आणली जात असल्याचे पोलिसांना कळाले. त्यावरून त्यांनी आरोपीला जेरबंद केले. कातडी वाघाचीच आहे का, हे तपासण्यासाठी वन विभागाच्या कर्मचा-यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. कातडी वाघाचीच जमादार मंगेश जाधव यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री ९.१५ वाजता पोलिसांनी उस्मानपुरा चौकात सापळा रचला गाडी थांबवली. वाहनात पाच जण बसलेले होते पिशवीमध्ये कासव आढळून आले. या वेळी गाडीची तपासणी करेपर्यंत दोघेजण पळून गेले. पण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली. वनपाल एस.डी. जाधव, एन. एम. जाधव हे तत्काळ ठाण्यात पोहोचले आरोपींना ताब्यात घेतले. कासवाच्या अंगावर कोणत्याही जखमा नसून त्याची खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यात तो सुदृढ असल्याचा अहवाल आला असून कासवाला वन विभागाच्या कार्यालय परिसरातील हौदात ठेवण्यात आले आहे. चार चौकीदार त्याची देखभाल करत असून गुरूवारी न्यायालयाच्या परवानगीने त्याला जायकवाडी धरणात सोडण्यात येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रवारपर्यंतपोलिस कोठडी : कासवतस्करी प्रकरणात तीन आरोपींना नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. खान यांनी दिले. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक मजीद शेख खान यांनी फिर्याद दिली होती. सरकार पक्षातर्फे अॅड. योगेश सरोदे यांनी काम पाहिले.
खरेदीकरते कोण ? : कासवनेमके कोठून आणले आणि त्याला कोण खरेदी करणार होते, हे अजून पोलिसांच्या समोर आले नाही. पोलीस कोठडीदरम्यान याचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीच्या प्रकरणांत खरदीदार शोधण्यात अपयश आल्याने या वेळीही खरेदीदारांचा शोध लागेल की नाही, याविषयी शंका आहे. फरार ओरापींना शोधण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला.
का आहे कासवाला मागणी?
कासवाच्यामदतीने गुप्तधन शोधता येते. घरात पैशांचा पाऊस पडतो तसेच घरात कासव असेल तर भरभराट येते, दीर्घायुष्य लाभते, असे एक ना अनेक समज आहेत. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते, असे निसर्ग मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी यांनी सांगितले. उस्‍मानपुरा आणि क्रांती चौक पोलिसांनी बुधवारी कासव, वाघाच्या कातडीची तस्करी रोखली. काळ्या बाजारात या दोन्हींना मोठी मागणी असल्याने लाखो रुपयांची तस्करी रोखण्यात त्यांना यश आले. वाघाची कातडी हैदराबादहून आणल्याचा संशय असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे, तर चार किलो ३०० ग्रॅम वजनाच्या कासवासाठी अंदाजे ४० लाखांचा व्यवहार होणार होता; पण पोलिसांनी डाव उधळला. यात तिघा जणांना ताब्यात घेतले असून दोघांनी पोबारा केला. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.