आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखधंदा: चिळंबी येथून अडीच लाखांचे स्पिरिट जप्त, पुणे जिल्ह्यात कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिळंबी येथून जप्त केलेले स्पिरिटचे ड्रम. - Divya Marathi
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिळंबी येथून जप्त केलेले स्पिरिटचे ड्रम.
औरंगाबाद - राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठ दिवसांपूर्वी स्पिरिटचा साडेआठ हजार िलटर साठा जप्त करून सहा आरोपींना अटक केली होती. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीवरून उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिळंबी फाटा येथील गोदामातून आणखी अडीच लाख रुपये किमतीचे चार हजार चारशे लिटर स्पिरिट जप्त केले आहे. निरीक्षक शिवाजी वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मागील आठवड्यात वाळूज एमआयडीसी भागात तीन ठिकाणी छापे टाकून राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी साडेआठ हजार िलटर स्पिरिट जप्त केले होते. याप्रकरणी महेंद्रकुमार उमाशंकर पाठक (रा. उत्तर प्रदेश) आणि चालक दादासाहेब भागवत ढोकणे (रा. गेवराई, बीड) या दोघांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
बनावट विदेशी मद्यनिर्मितीसाठी हे स्पिरिट वापरले जात असल्याचा संशय अाहे. ११ जुलै रोजी करण्यात आलेली कारवाई आणि चिळंबी (खेड) येथील कारवाई अशा दोन्ही कारवायांत एकूण १७ लाख १३ हजार लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले आहे. हे स्पिरिट हरियाणातून आणले असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

दरम्यान, या आरोपींना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची वाढीव कोठडी सुनावली आहे. सदरील कारवाई अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी वानखेडे, सुशील चव्हाण, के. पी. जाधव, रतन फुसे, गणेश फुसे, बाळासाहेब नवले, अनिल जायभाये, किशोर ढाले, श्रावण खरात आदींनी पार पाडली.

करचुकवेगिरी
सरकारचाकर चुकवून हे स्पिरिट चोरट्या मार्गाने राज्यभरात पोहोचवले जात असे. या स्पिरिटपासून फक्त विदेशी दारूच बनवली जात असल्याने ते चोरट्या मार्गाने आणले जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...