आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादांशी आहे या आयपीएसचे नाते, यूपी केडरने केले होते अलविदा; आता औरंगाबाद पोलिस आयुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादचे नवे पोलिस आयुक्त यशस्वी यादव. - Divya Marathi
औरंगाबादचे नवे पोलिस आयुक्त यशस्वी यादव.
औरंगाबाद - आयपीएस यशस्वी यादव यांची ठाण्यातून औरंगाबादेत बदली झाली असली तरी त्याआधी ते उत्तर प्रदेशात होते. तेथील त्यांची कारकिर्द वादग्रस्त अधिकारी अशी राहिली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि कानपूर सारख्या महत्त्वाच्या शहारात ते कार्यरत होते. मुळचे महाराष्ट्र केडरचे असलेले आयपीएस यशस्वी यादव 2012 मध्ये अखिलेश यादव यांचे सरकार आल्यानंतर प्रतिनियुक्तीवर उत्तर प्रदेशात गेले होते. जुलै 2016 मध्ये कार्यमुक्त करुन त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते, त्यामुळेच त्यांना उत्तर प्रदेशात नियुक्त केले गेले असल्याची तेव्हा चर्चा होती. 
 
वादांशी राहिले आहे नाते.. 
- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आयपीएस यशस्वी यादव यांचे वादांशी जुने नाते आहे. 
- यादव यांनी कानपूर येथील हेलेट रुग्णालयात डॉक्टरांवर लाठीमार केला होता. ही बाब उच्च न्यायालयापर्यंत गेली होती. त्यानंतर त्यांची लखनऊ येथे बदली करण्यात आली. 
- लखनऊतदेखील काही विवादास्पद खुलासे त्यांनी केले. ज्यामुळे पोलिस खात्याची किरकिरी झाली.
- मात्र, सत्ताधाऱ्यांसोबतच्या त्यांच्या संबंधामुळे त्यांना प्रमोशन देऊन पोलिस उप महानिरीक्षक पदी नियुक्ती करुन बदली करण्यात आली. 
- कानपूर शहरात असताना अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस साजरा करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांशीही त्यांचे वाद झाले होते. वेळ मारहाणीपर्यंत गेली होती. या प्रकरणाची उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. 
- समाजवादी पक्षाची सत्ता डळमळीत होताना दिसताच यादव यांची मूळ केडर असलेल्या महाराष्ट्र राज्यात बदली झाली.   
 
अखिलेश यादवांचे मित्र असल्याची चर्चा 
- लखनऊमध्ये नियुक्ती असताना यशस्वी यादव हे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे मित्र असल्याच्या चर्चा रंगत होत्या. काही अंशी ते खरेही होते. 
- राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाल्याबरोबर तत्कालिन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महाराष्ट्र केडरेच आयपीएस यशस्वी यांची राज्यात प्रतिनियुक्तीवर नेमणूक ेकली होती. 
- उत्तर प्रदेशात असताना ते वन मॅन आर्मी प्रमाणेच राहात होते, त्यामागे राज्याच्या मुखियासोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीमुळेच हे शक्य असल्याची चर्चा होती. 
 
सरकारला अनेकदा आणले गोत्यात.. 
- कानपूरमध्ये नियुक्ती असताना आयपीएस यशस्वी यादव यांनी पेट्रोल पंपांवर धाडी टाकून नमुने जप्त केले होते. 
- तत्कालिन जिल्हाधिकारी समीर वर्मा यांनी यावर नाराजी व्यक्त करत शासनाला पत्र लिहिले होते. त्यानंतर आयपीएस यशस्वी यादव आणि जिल्हाधिकारी वर्मा यांनी एकमेकांवर जणू तलवारी उपसल्या होत्या. 
- लखनऊमध्ये असताना तेलंगणामध्ये मारल्या गेलेले बिजनौर ब्लास्टचे आरोपी एजाजुद्दीन आणि असलम अयूब यांचे लखनऊ एटीएम लुटमारीशी संबंध असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र तेलंगणा पोलिसांनी अशा कोणत्याही खुलाशाला स्पष्ट नकार दिला होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, औरंगादच्या नव्या आयुक्ताचे निवडक फोटोज... 
हे पण वाचा... आदेश मिळताच काही तासांत पोलिस आयुक्तपदी यादव रुजू
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...