आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Police Commissioner Review To Ganesh Festival

कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार अधिकार्‍यांशी संवाद; पोलिस महासंचालक घेणार आढावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यातील प्रत्येक पोलिस महानिरीक्षक कार्यालय, आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्यवस्था बसवण्यात येणार आहे. सध्या केबल टाकण्याचे काम सुरू असून येत्या दीड महिन्यात हे काम पूर्णत्वास जाईल.

गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी सर्व आयपीएस अधिकार्‍यांची दर सहा महिन्यांनी मुंबईला पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांच्या कार्यालयात बैठक घेतली जाते. एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित असतात. या बैठकीत कोणत्या स्वरूपाचे गुन्हे अधिक घडत आहेत, त्यांना कसा आळा घालता येईल यावर चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येते. मात्र, कामाच्या धबडग्यामुळे काही अधिकारी बैठकीला हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे कधी-कधी ही बैठक चारचार महिने पुढे ढकलावी लागते. यावर महासंचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपाय शोधला. सध्या औरंगाबाद पोलिस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयातील काम पूर्णत्वास आले असून एक ते दीड महिन्यात केबलचे काम पूर्ण होणार आहे. पोलिस आयुक्तालयात उपायुक्त डॉ. जय जाधव यांच्या केबिनमध्ये कॉन्फरन्सची व्यवस्था होत आहे. त्यामुळे त्यांचे कार्यालय पैठण गेट येथील वाहतूक पोलिस शाखेच्या कार्यालयात हलवले जात आहे.

दीड महिन्यात काम
इतर शासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिसून येत आहेत. वेळ वाचावा या अनुषंगाने पोलिस महासंचालकांनी हा तोडगा काढला. दीड महिन्यात काम पूर्णत्वास जाण्याची आशा आहे.
- ईशू सिंधू, पोलिस अधीक्षक.