आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक घडामोडीवर पोलिसांची करडी नजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिस गाफील असल्याचे कोणी समजू नये. कारण कोण काय करतो याची सर्व माहिती आमच्याकडे असते, असा सज्जड दम पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिला.

आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भयभीत ईशान्य प्रांतातील विद्यार्थी शहर सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली आहे. त्यांच्या संरक्षणासाठी नव्याने हेल्पलाइन उघडण्यात आली आहे. आज सकाळी मणिपूरहून तीन मेसेज आले असून तेथील पालकांनी पोलिसांमुळे आमची मुले सुरक्षित असल्याचे कळवले आहे. पोलिसांचे फोन क्रमांक आसामच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. वाईट घटनेचा निश्चितच निषेध करायला हवा. घडलेल्या घटनेचा आधार घेऊन जर शहराची शांतता भंग केली जात असेल तर मात्र हा प्रकार भयंकर आहे.
कोणत्याही प्रकारचा तणाव पोलिसांकडून निर्माण होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. फेसबुकवर बनावट क्लिपिंग लोड करून त्या पसरवणार्‍या व्यक्तीची माहिती आम्हाला मिळाली आहे.
9 ऑगस्ट रोजी त्याचे फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून सायबर क्राइमचे पथक त्याचा शोध घेत आहे. अवघ्या दहा मिनिटांत कुठल्याही घटनास्थळी पोलिस यंत्रणा पोहोचू शकेल असा बंदोबस्त शहरभर लावण्यात आला आहे, असे पोलिस आयुक्तांनी या बैठकीत सांगितले.
तरुणांचा सहभाग आवश्यक - अनुचित प्रकार घडल्यास जमावाला शांत करण्याची जबाबदारी पोलिस येईपर्यंत तरुणांनी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे हाताबाहेर परिस्थिती गेल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, जेणेकरून तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल होतील.
या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, डॉ. कल्याण काळे, किशनचंद तनवाणी, संजय शिरसाट, एम. एम. शेख, महापौर अनिता घोडेले, माजी महापौर रशीदमामू यांची उपस्थिती होती.